आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Tarn Taran Is The Young Man Who Hoisted The Saffron Flag On The Red Fort, The Family Said Jugraj Singh Was Instigated

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाल किल्ल्यावर झेंडा लावणाऱ्याची पाठराखण:आरोपी जुगराज पंजाबच्या तरनतारन येथील रहिवासी, नातेवाईक म्हणाले - 'त्याला भडकावण्यात आले'

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गावातील लोकांना TV पाहूनच मिळाली घटनेची माहिती

शेतकरी आंदोलनाच्या नावावर 26 जानेवारीला दिल्लीमध्ये जी हिंसा झाली यामुळे संपूर्ण देश लाजिरवाणा आहे. या दिवशी लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज स्थापित करण्यात आला.याचा आरोप 22 वर्षीय जुगराज सिंहवर आहे. तो पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील वारा तारा सिंह या गावचा रहिवासी आहे. तो मजूर म्हणून काम करतो. त्याच्या कुटुंबावर पाच लाखांचे कर्ज आहे.

26 जानेवारीच्या रात्री 10 वाजताच पोलिस जुगराज याच्या घरी पोहोचले होते. चौकशीमध्ये जुगराज सिंहचे वडील बलदेव सिंह यांनी सांगितले होते की, त्यांचा मुलगा शेतकरी आंदोलनात सामिल होण्यासाठी दिल्लीत गेला आहे. यानंतरपासून जुगराजचे वडील बलदेव सिंह, आई भगवंत कौर आणि एक बहिण अंडग्राउंड झाले आहेत. जुगराजसोबतही कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.

जुगराजच्या कुटुंबात आई-वडील, आजी-अजोबा आणि तीन बहिणी आहेत. दोन बहिणींचे लग्न झाले आहेत. त्यांचे गाव तारा सिंह पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ आहे. येथील दोन एकर जमीनीवर जुगराजचे कुटुंब शेती करते. कुटुंबावर पाच लाखांचे कर्ज आहे.

जुगराज मजुरी करतो
मॅट्रिक पास जुगराज अडीच वर्षांपूर्वी चेन्नईच्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेला होता. मात्र पाच महिन्यानंतरच परतला होता. आता तो मजुरी करतो. असे सांगितले जात आहे की, 24 जानेवारीला दोन ट्रॅक्टर-ट्रॉली दिल्लीसाठी रवाना झाल्या होती. जुगराजही त्यांच्यासोबत आला होता.

जुगराजचे आजोबा महल सिंह
जुगराजचे आजोबा महल सिंह

आजीने केली नातवाची पाठराखण
जुगराजच्या घरी सध्या आजोबा महल सिंह आणि आजी गुरचरण कौर आहेत. आजीने सांगितले की, गावात सहा गुरुद्वारे आहेत. जुगराज या गुरुद्वारांमध्ये निशान साहिबवर चोला चढवण्याची सेवा करायचा. आपल्या नातवाची पाठराखण करत त्या म्हणाल्या की, सोबतच्या लोकांनी भडकावल्यानंतर जुगराजने लाल किल्ल्यावर झेंडा लावला असेल.

जुगराजच्या गावातील लोक म्हणतात की, जुगराज आणि त्याच्या कुटुंबाचा खालिस्तान आंदोलनाशी काहीच संबंध नाही.
जुगराजच्या गावातील लोक म्हणतात की, जुगराज आणि त्याच्या कुटुंबाचा खालिस्तान आंदोलनाशी काहीच संबंध नाही.

गावातील लोकांना TV पाहूनच मिळाली घटनेची माहिती
गावातील साधा सिंह, प्रेम सिं, गुरसेवक सिंह आणि महिंदर सिंह म्हणतात की, काही खोडकर लोकांनी ही चुकीची गोष्ट केली आहे. कुटुंब आणि गावातील लोकांनी जुगराजचा कोणत्याही खालिस्तानी मूव्हमेंटशी संबंध नसल्याचे सांगितले आहे. ते म्हणतात की, त्यांना TV पाहूनच या घटनेविषयी माहिती मिळाली. दुसरीकडे, एका पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की हे प्रकरण खलिस्तान चळवळीशी संबंधित आहे की नाही याची चौकशी केली जात आहे.