आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Taste The Spices In The Kitchen, You Can Find Out Whether You Have Corona Or Flu

कोरोना टेस्ट:किचनमधील मसाले चाखा, समजेल कोरोना की फ्लू; 38 देशांतील 500 शास्त्रज्ञांनी बनवली प्रश्नावली

चंदिगड3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शास्त्रज्ञांनी बनवली प्रश्नावलेली जोडली जाणार आरोग्य अॅपशी

ननू जोगिंदरसिंग 

उपाययोजना करण्यासाठी जगभर धडपड सुरू आहे. अशा या परिस्थितीत घरात कुणाला कोरोनासारखी लक्षणे असलेला आजार झाला तर प्राथमिक टप्प्यात आपल्यात जाणवणारी लक्षणे किती गंभीर आहेत हे  ओळखणार कसे?...आता घरात बसूनच व्यक्तीला कोरोनाची लक्षणे जाणून घेता येतील. 

भारतासह सुमारे ३८ देशांमधील ५०० शास्त्रज्ञांनी एक प्रश्नावली तयार केली आहे. या प्रश्नांच्या उत्तरांतून सहज लक्षात येईल की एखाद्याला कोविड- १९ अाजार आहे की साधा फ्लू.

वास्तविक दोन्ही आजारांची लक्षणे अनेक बाबतीत सारखी आहेत. यामुळे कोविडची चाचणी करायची आवश्यकता आहे की नाही हे जाणून घेणे कठीण जाते. शास्त्रज्ञांनी जी प्रश्नावली तयार केली तो एक प्रकारचा सर्व्हे आहे. यात तुमच्या स्वयंपाकघरातील मसाले आणि औषधी वनस्पती चाखून तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. 

भारताच्या सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रूमेंट आॅर्गनायझेशनचे (सीएसआयओ) डॉ. रितेश कुमार, डॉ. अमोल पी. भोंडेकर आणि डॉ. रिशमजित सिंग यांचा या शास्त्रज्ञांत समावेश आहे. टाटा संशोधन संस्था, राष्ट्रीय जैविक विज्ञान केंद्र आणि आयआयटी दिल्लीचे शास्त्रज्ञही त्यात आहेत. 

हुंगणे आणि चव याचा आधार

श्वसनाचे आजार झाल्यावर हुंगणे व चव घेण्याची क्षमता कमी होण्याच्या तत्त्वावर हा गट काम करत आहे. सध्या रॉयल सोसायटीच्या शिष्यवृत्तीवर इंग्लंडमध्ये असलेले डॉ. रितेश यांनी सांगितले की, सार्सनंतर दक्षिण कोरियाने सर्वात आधी यावर संशोधन केले होते. त्यात समजले की, अशा संसर्गात ३०% प्रकरणात चव आणि गंध घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. ज्या देशांमध्ये तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे तेथील रुग्णालयात त्याची अंमलबजावणी होत आहे.भारतीय शास्त्रज्ञांनीही सुंगण्याची क्षमता तपासण्यासाठी प्रश्नावली व अॅप तयार केले आहे.

मंजुरीची प्रतीक्षा

या नव्या चाचणी पद्धतीची भारतात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तत्त्वत: मंजुरीची प्रतीक्षा आहे. सुमारे दीड दशकापासून चव आणि गंधा याच्याशी संबंधित सेन्सरवर काम करणारे डॉ. अमोल यांनी सांगितले की, मंजुरीनंतर ही प्रश्नावली किंवा अॅप भारत सरकारच्या आरोग्य सेतूसोबत जोडले जाईल.

बातम्या आणखी आहेत...