आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटाटा समूहाच्या टाटा मोटर्स व टायटन या 2 कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी जोरदार तेजी दिसून आली. मंगळवारीही हे दोन्ही शेअर्स हिरव्या रंगात उघडले. सोमवारी या दोन्ही शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या नेटवर्थमध्ये तब्बल 400 कोटींची वाढ झाली. ही वाढ अवघ्या 15 मिनिटांत झाली. म्हणजे शेअर मार्केटच्या ओपनिंग बेलच्या अवघ्या 15 मिनिटांतच रेखा झुनझुनवाला यांनी शेकडो रुपये आपल्या खिशात घातले होते.
15 मिनिटांची जोरदार वाढ
टायटनच्या शेअर्समध्ये सोमवारी ओपनिंग बेलच्या 15 मिनिटांत प्रतिशेअर 50.25 रुपयांची वाढ झाली. डिसेंबरच्या तिमाहीच्या शेअर होल्डिंग आकडेवारीनुसा, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4,58,95,970 शेअर्स आहेत. म्हणजे त्यांच्याकडे टायटनची 5.17 टक्के भागीदारी आहे. प्रति शेअरच्या हिशोबाने ही वाढ पाहिली, तर रेखा झुनझुनवाला याच्या संपत्तीत 230 कोटींची वाढ झाली आहे. (50.25 रुपये x 4,58,95,970). गत 5 दिवसांत टायटनच्या शेअर्समध्ये 2.54 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
टाटा मोटर्सच्या शेअर्समधून 170 कोटी कमावले
टाटा मोटर्सच्या शेअर्सवर बोलायाचे तर, या शेअर्समध्ये ओपनिंग बेलच्या 15 मिनिटांतच 32.75 रुपयांची वाढ झाली. डिसेंबरच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 5,22,56,000 शेअर्स आहेत. ते 1.57 टक्के भागीदारीएवढे आहेत. म्हणजे टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत जवळपास 170 कोटींची वाढ झाली. सोमवारी टाटा मोटर्सच्या शेअर्सनी 470 रुपयांचा आकडा ओलांडला होता.
आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत टाटा मोटर्सच्या ग्लोबल सेलमध्ये आलेल्या उसळीचा थेट परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून आला. टाटा मोटर्सच्या ग्लोबल होलसेल 8 टक्क्यांनी वाढून 3,61,361 यूनिटवर पोहोचली.
राकेश झुनझुनवाला यांनी खेळला होता मोठा डाव
रेखा झुनझुनवाला दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत. राकेश यांच्या मृत्यूनंतर त्याच त्यांचा पोर्टफोलिओ सांभाळत आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, 2002-03 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी टायटनचे शेअर्स प्रति 3 रुपये दराने खरेदी केले होते. आज टायटनचा शेअर 2,596.35 रुपयांवर व्यापार करत आहे. त्याचा 52 आठवड्यांतील उच्चांक 2,791 रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्समुळे झालेल्या जबरदस्त नफ्यामुअळेच झुनझुनवाला यांचे नाव शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध झाले.
शेअर बाजाराशी संबंधित खालील बातमी वाचा...
शेअर बाजार अपडेट्स:सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा केला पार, 30 पैकी 24 शेअर्स वधारले, 80 अंकांची सेन्सेक्समध्ये वाढ
भारतीय शेअर बाजारात आज म्हणजेच मंगळवारी (11 एप्रिल) तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 182 अंकांच्या वाढीसह 60,028 च्या पातळीवर उघडला. दुसरीकडे, निफ्टी 80 अंकांनी वधारला. ते 17,704 वर उघडले. सुरुवातीच्या व्यापारादरम्यान, सेन्सेक्सच्या 30 पैकी 24 समभागांमध्ये वाढ आणि 6 मध्ये घट झालेली आहे.
अदानी समूहाचे सर्व 10 समभाग वधारले
आज अदानी समूहाच्या सर्व 10 समभागांमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सकाळी 9.30 वाजता अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक 1.08% वर होता. दुसरीकडे, अदानी ट्रान्समिशन, टोटल गॅस आणि ग्रीन एनर्जीचे शेअर्स प्रत्येकी 5-5% वाढताना दिसत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.