आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्ध्वस्ताच्या खुणा:तौक्ते गुजरातच्या सीमाभागास तडाखा, 5958 गावे अंधारात

अनिरुद्ध शर्मा, विनोद यादव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नौदलाने 188 जणांना वाचवले, आतापर्यंत 620 जणांचा बचाव

चक्रीवादळ तौक्ते राजस्थानकडे वळले असले तरी या वादळामुळे अनेक कुटुंबे, गावे उद्ध्वस्त झाली. त्याच्या खुणा दिसून येतात. वादळाचा तडाखा गुजरातच्या सीमेवरील भागाला बसला. ५ हजार ९५८ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी २१०१ गावांत ही सेवा पूर्ववत झाली. ३८५० गावे अजूनही काळोखात आहेत. २ लाखांहून जास्त झाडे उन्मळून पडली. २० हजारांहून जास्त कच्च्या घरांची हानी झाली आहे. सर्वाधिक नुकसान अमरेली, गीर-सोमनाथ, जुनागड, पोरबंदर, राजकोट, भावनगर, बोटाद जिल्ह्यांचे झाले आहे.

दुसरीकडे वादळादरम्यान चार जहाजे पी ३०५, जीएएल कन्स्ट्रक्टर, सागर भूषण व सपोर्ट स्टेशन-३ बेपत्ता झाले होते. या जहाजात एकूण ७०७ लोक होते. त्यापैकी ६२० जणांचा वाचवण्यात यश मिळाले. नौदलाचे अधिकारी म्हणाले, सर्वाधिक २७३ लोक पी ३०५ मध्ये होते. बचाव पथकाबाबत आयएनएस कोचीचे कॅप्टन सचिन सिक्वेरी म्हणाले, १७ मे रोजीसारखेच आम्हाला समुद्रात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे आदेश मिळाले होते. आम्ही तासाभरात रवाना झालो. वादळी वाऱ्याचा वेग ताशी १०० किमी होता. १० मीटरपर्यंत उंच लाटा उसळत होत्या. अशा परिस्थितीत आमच्या टीमने जिद्दीने शोधकार्य सुरू ठेवले. जहाजाला बुडताना पाहिलेल्या ठिकाणी आम्ही आधी शोध घेतो. त्यानंतर वादळाचा वेग लक्षात घेऊन बचावकार्य सुरू ठेवतो.

नौदलाच्या बचाव पथकाने ताशी १० किमी वेगाने वाहणारे वारे, लाटांमधून १८८ जणांना वाचवले, आतापर्यंत ६२० जणांचा बचाव

रडार ठप्प : वादळाचा अंदाज चुकला तौक्तेदरम्यान मुंबई रडार ठप्प होते. त्यामुळेच हवामान विभागाने आधी द्वारका, नंतर दीवला वादळ धडकल्याचा दावा केला. या वेळी अम्फानसारखा अचूक अंदाज लावता आला नाही. मुंबई रडार काम करू शकले नाही. त्यामुळे हे घडले. मुंबई रडारद्वारे तौक्तेला ट्रॅक करता आले नाही. ही बाब हवामान विभागाने लपवली. सुरुवातीला वादळ १८ मे रोजी गुजरातच्या द्वारकेजवळ धडकू शकेल, असे म्हटले होते. परंतु नंतर त्यात सुधारणा करून वादळ १७ मेला दीवजवळ धडकणार असल्याचे सांगण्यात आले. वादळाची दिशा, मार्ग, वेग या गोष्टींवर निगराणी व त्याबद्दलची भविष्यवाणी करता येईल, अशी अनेक साधने आपल्याकडे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

दुसऱ्या वादळाचे संकेत..नाव : यास, २६-२७ ला धडकेल
अंदमान सागर व पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात २२ मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकेल. त्यामुळे पुढील ७२ तासांत त्याचे वादळात रूपांतर होऊ शकते. पुढे ते आेडिशा, पश्चिम बंगालदरम्यान २६-२७ मे रोजी धडकण्याचा अंदाज आहे. मोसमी स्थिती वादळात रूपांतरित झाल्यास त्याचे नाव ‘यास’ असेल आणि वादळात रूपांतरित झाले नाही तर हे नाव पुढील वादळाला दिले जाईल. आेमानने हे नाव दिलेले आहे. मान्सूनपूर्व काळात गेल्या वर्षी अम्फान बंगालच्या खाडीत गंगासागर भागात धडकले होते. परंतु यास अम्फानसारखे भयंकर नसेल.

बातम्या आणखी आहेत...