आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये 9 डिसेंबर रोजी भारतीय जवानांचा सपाटून मार खाणाऱ्या चीनच्या भारतालगतच्या आपल्या हवाईतळावरील हालचाली वाढल्या आहेत. येथे फायटर जेट्स व ड्रोनची संख्या वाढली आहे. मॅक्सार टेक्नोलॉजीच्या उपग्रह छायाचित्रात चीनच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत आहेत.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, चीनने बांगदा एअरबेसवर सोरिंग ड्रॅगन ड्रोन तैनात केलेत. हा ड्रोन सॅटेलाइट इमेज पाठवत आहे. बांगदा हवाईतळ अरुणाचल सीमेपासून अवघ्या 150 किमी अंतरावर आहे. चीनची ही सक्रियता पाहून भारतीय हवाई दलानेही गत गुरुवार व शुक्रवारी युद्ध सराव केला होता.
तत्पूर्वी, 11 डिसेंबर रोजी अमेरिकेच्या वॉर झोन नामक संरक्षण संकेतस्थळाने एक सॅटेलाइट इमेज जारी केली होती. त्यात तिबेटच्या शिगात्से पीस एअरपोर्टवर चीनची 10 विमाने व 7 ड्रोन दिसून आले होते. तिबेटमधील न्यिंगची, शीगत्स व नागरीत चीनची 5 विमानतळे आहेत. हे सर्व भारत-नेपाळच्या सीमेलगत आहेत. चीनने गतवर्षीच ल्हासाहून न्यिंगचीपर्यंत बुलेट ट्रेनची सुरुवात केली होती. हा भाग अरुणाचलच्या फार जवळ आहे.
पहिले आव्हान: ड्रॅगन ड्रोन निगराणी व हल्ल्यासाठी सक्षम
इमेजमध्ये सोरिंग ड्रॅगन ड्रोनसह टेम्पररी एअरक्राफ्ट शेल्टरही दिसून येत आहे. सोरिंग ड्रॅगन ड्रोन 2021 मध्ये सादर करण्यात आले होते. त्याचा वापर निगराणी, हेरगिरी व हल्ल्यासाठी केला जातो. हे ड्रोन सलग 10 तास उड्डाण करू शकते. विशेषतः हे ड्रोन जमिनीवरील टार्गेटचा वेध घेण्यासाठी क्रूझ क्षेपणास्त्राला डेटा ट्रान्सफरही करू शकते असा दावा केला जात आहे. भारताकडे या श्रेणीचे अजूनही एकही ड्रोन नाही. ही काळजीची गोष्ट आहे.
दुसरे आव्हान : चिनी नेटवर्क तयार व सक्रिय
NDTVशी बोलताना एक माजी फायटर पायलट समीर जोशी यांनी सांगितले की, या ड्रोनची क्षमता पाहून चीनने नॉर्थ ईस्टमधील मॅकमोहन लाइनजवळ एक सक्रिय नेटवर्क उभे केल्याचे दिसून येत आहे. या ड्रोनच्या मदतीने चीनच्या हवाई दलाला भारताच्या ग्राउंड पोजिशंसवर नजर ठेवता येईल. या पोजिशंसला दुसऱ्या ड्रोन किंवा लढाऊ विमानाच्या मदतीने लक्ष्य करता येईल. समीर हिंदुस्तान एअरोनॉटिक्सच्या मदतीने भारतीय सैनिकांसाठी नव्या पीढीचे ड्रोन तयार करण्याचे काम करत आहेत.
तिसरे आव्हान : तवांगनंतर बांगदावर दिसली होती लढाऊ विमाने
9 डिसेंबर रोजी तवांगमध्ये चकमक झाल्यानंतर 5 दिवसांनी म्हणजे 14 डिसेंबर रोजी बांगदा हवाई तळावर फायटर प्लेन दिसून आले होते. हे फ्लँकर टाइम फायटर जेट्स म्हणजे सुखोई-30 चे चिनी व्हर्जन. फोर्स एनालिसिसच्या सिम टॅकच्या मते, तिबेट क्षेत्रातील चीनची हवाई क्षमता भारतीय हवाईदलापेक्षा जास्त आहे.
चीनला काय हवे: भारतीय हवाई दलाची क्षमतेचा अंदाज घेणे
तज्ज्ञांच्या मते, भारतीय हवाई दलाने अरुणाचलमध्ये युद्ध सराव केल्यानंतर चीनच्या बांगदातील हालचाली वाढल्या. हा संयोग असू शकतो. चीन भारतीय हवाई दलाचे वॉरगेम्स, त्याची रणनीती समजण्यासाठी आपले रडार व इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी असे करत असावा. या माहितीचा वापर तो युद्धात भारताविरोधात करू शकतो.
भारतीय हवाई दलाचा युद्ध सराव
भारतीय हवाई दलाने गत गुरुवारी व शुक्रवारी युद्ध सराव केला होता. त्यात अत्याधूनिक लढाऊ विमान राफेल व सुखोई-30MKI सह हवाई दलाच्या जवळपास 40 फ्रंटलाइन लढाऊ विमाने सहभागी झाली होती. ईस्टर्न एअर कमांड क्षेत्रात झालेल्या या सरावात प्रगत वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम विमानही सहभागी झाले होते. केंद्राने हा युद्ध सराव एक सामान्य प्रक्रिया असल्याचा दावा केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.