आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक वर्ष 2020-21 साठी 30 सप्टेंबरपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरावा लागणार आहे. आयटीआर भरताना आपल्या उत्पनाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. आपल्या बँकमधील बचत खात्यावर, फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि रिकरिंग डिपॉझिट (RD) वर मिळणाऱ्या व्याजावरदेखीलकर भरावा लागतो हे अनेक जणांना माहित नसते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
'इतर स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न' मानले जाते
आयकर कायद्यानुसार, या बचत योजनांमधून मिळणारे व्याजाला 'इतर स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न' असे मानले जाते. या तीन गुंतवणुकीवरील व्याज उत्पन्नावर किती कर लावला जातो हे आपल्याला सीए अभय शर्मा सांगणार आहेत.
बचत खाते
आयकर कायद्याच्या कलम 80 टीटीए अंतर्गत, बँक/सहकारी संस्था/पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यापासून मिळणारे वार्षिक 10,000 रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त आहे. याचा लाभ 60 वर्षांखालील व्यक्ती किंवा HUF (संयुक्त हिंदू कुटुंब) साठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सूट 50 हजार रुपये आहे. जर उत्पन्न यापेक्षा जास्त असेल तर टीडीएस कापला जातो. पोस्ट ऑफिस बचत खात्यातून होणाऱ्या वार्षिक व्याज उत्पन्नावर कलम 10(15) अंतर्गत 3500 रुपयांपर्यंत अतिरिक्त कपातीचा दावा केला जाऊ शकतो. ही अतिरिक्त कपात 10000/50000 च्या मर्यादेव्यतिरिक्त उपलब्ध आहे.
फिक्स्ड डिपॉझिट (FD)
एका आर्थिक वर्षात एफडीवर मिळणारे व्याज जर 40 हजारांपेक्षा कमी असेल तर त्यावर कोणतेही कर द्यावे लागत नाही. परंतु, ही मर्यादा केवळ 60 वर्षांखालील लोकांसाठी आहे. तर दुसरीकडे, 60 वर्षांवरील लोकांना एफडीवर मिळणारे 50 हजार रुपयापर्यंतचे व्याज करमुक्त आहे. जर एफडीवरील व्याज यापेक्षा जास्त असेल तर त्यावर 10% टीडीएस कापला जातो.
आरडीपासून (RD) मिळणाऱ्या व्याजवर कर
रिकरिंग डिपॉझिट (RD) मिळणाऱ्या व्याजावर 40 हजार रुपयापर्यंत कोणतेही कर भरावे लागत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50 हजार रुपयापर्यंत आहे. परंतु, तुमचे व्याज जर दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यावर 10% टीडीएस कापला जातो.
पॅन नसल्यास जास्त कर भरावा लागतो
बँकांनी दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त व्याज असेल तर त्यावर 10 टक्के टीडीएस कापला जातो. परंतु, जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल किंवा ते तुम्ही बँकेत जमा केले नसेल तर तुम्हाला डबल कर भरावा लागतो. म्हणजे तुमचे टीडीएसचे दर 20 टक्के होते.
जर तुमचे उत्पन्न करपात्र यादीत येत नसेल तर काय करावे?
आयकर स्लॅबनुसार, तुमच्या FD वर मिळणाऱ्या व्याजावरदेखील कर आकारला जातो. एफडीवर मिळणारे व्याज एका वर्षात 10 हजारांवर असेल तर त्यावर टीडीएस कपात होते. हे कपात एकूण मिळणाऱ्या व्याजाच्या 10% असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50 हजार आहे. तथापि, जर तुमचे उत्पन्न करपात्र श्रेणीपेक्षा कमी असेल तर तुम्ही FD वर टीडीएस कपातीला परवानगी न देण्यासाठी फॉर्म 15G आणि फॉर्म 15H सबमिट करू शकता. जर तुमचे उत्पन्न यापेक्षा कमी असेल तर तुमचे टीडीएस कपात होत नाही.
TDS काय असते?
जर कोणत्याही व्यक्तीच्या उत्पन्नातून कापल्या जाणाऱ्या कराला टीडीएस असे म्हणतात. सरकार टीडीएसद्वारे कर गोळा करते. हे कर विविध प्रकारच्या उत्पन्नाच्या स्त्रोतावरुन कापले जाते. उदा. वेतन, व्याज किंवा कोणत्याही गुंतवणूकीवर मिळालेले कर. कोणतीही संस्था (जी टीडीएसच्या कक्षेत येते) जी कर भरत आहे, ती विशिष्ट रक्कम टीडीएस म्हणून कापत असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.