आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • TCS Handled The Construction Of Shri Ram Janmabhoomi Temple; Estimated Cost Of Rs 25 Crore Per Month |marathi News

दिव्य मराठी विशेष:श्री राम जन्मभूमी मंदिर बांधकामाचा हिशेब टीसीएसने सांभाळला; दरमहा 25 कोटी रुपये खर्चाचा अंदाज

लखनौ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री राम जन्मभूमी मंदिराची ३० टक्के उभारणी पूर्ण झाली आहे. मंदिराचा पहिला मजला, गाभाऱ्याची उभारणी डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल. गाभाऱ्यात श्रीरामलल्ला विराजमान होतील व प्राणप्रतिष्ठा पूजाही होईल. यानंतर पहिला मजला भाविकांसाठी दर्शन व पूजेसाठी उघडला जाईल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याची उभारणी सुरूच राहील.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी शनिवारी सांगितले की, मंदिरात राजस्थानातील भरतपूर येथील नक्षीदार दगड लावले जातील. गाभाऱ्यात मकराना शुभ्र संगमरवर दगड लावले जातील. बंगळुरू, तेलंगणाहून मागवलेल्या ग्रेनाइट दगडांचे १७ हजार ब्लॉकपासून मंदिराचे प्लिंथ तयार होत आहे. ज्यावर मंदिराचे नक्षीदार दगड, स्तंभ लावले जातील. मंदिराचे क्षेत्रफळ २.७ एकर आहे. ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे १९२ कोटी रुपये मंदिरावर खर्च झाले आहे. मंदिर उभारणीत आता दरमहा सुमारे २५ कोटी रुपये खर्च होतील. ट्रस्टने खर्च, दानशूरांची पावती, मोबाइल संदेश पाठवणे आदी कामे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसवर सोपवली आहेत. तथापि, ट्रस्टने जमा-खर्चाची माहिती अद्याप दिलेली नाही. प्राप्त माहितीनुसार जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये मंदिर उभारणीसाठीच्या निधी संकलन मोहिमेतून देशातील ११४० ठिकाणांवरून रक्कम मिळाली होती. यापैकी सुमारे १०० जिल्ह्यांचे सध्या ऑडिटही सुरू आहे. चाणक्य मालिकेचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी हे संग्रहालयाचा आराखडा तयार करत आहेत.

मंदिर उभारणीच्या दुसऱ्या टप्प्यात ७० एकरवर संग्रहालय
मंदिर उभारणीच्या दुसऱ्या टप्प्यात ट्रस्ट ७० एकरवर एक संग्रहालय उभारणार आहे. यात डिजिटल आणि प्रत्यक्षपणे भगवान रामांशी संबंधित वस्तू प्रदर्शित केल्या जातील. यात जन्मभूमी परिसरातून खोदकामात सापडलेले मंदिराचे जुने अवशेष, भगवान रामांशी संबंधित जगभरात विखुरलेले ग्रंथ, चित्र आदी ठेवले जातील. ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी, चाणक्य मालिकेचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी, वासुदेव कामत आणि सच्चिदानंद जोशी याचा आराखडा तयार करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...