आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात महिला शक्तीने पुन्हा एकदा अापली क्षमता सिद्ध केली आहे. भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) हुरुन इंडियाच्या देशातील सर्वात मौल्यवान ५००० कंपन्यांच्या यादीत पहिल्या १० महिला नियोक्त्यांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. कंपनीत सुमारे ३५% म्हणजेच २.१ लाख महिला कर्मचारी आहेत. यादीत समाविष्ट असलेल्या ५०० कंपन्यांपैकी ४१० कंपन्यांनी त्यांच्या संचालक मंडळावर महिलांना प्रतिनिधित्व दिले आहे. या कंपन्यांनी गेल्या वर्षभरात ३.९ लाख नवीन नोकऱ्या दिल्या आहेत. यामध्ये आधीच ११.६ लाख महिला कार्यरत आहेत.
आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिसमध्ये १,२४,४९८ महिला आहेत. विप्रोमध्ये ८८,९४६, एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये ६२,७८० महिला कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये अनुक्रमे ४०%, ३६% आणि २८% महिला कर्मचारी आहेत. रिलायन्समध्ये महिलांची संख्या ६२,५६० आहे. यादीतील इतर पाच कंपन्यांमध्ये मदरसन सुमी सिस्टिम्स, टेक महिंद्रा, अायसीअायसीअाय बँक, एचडीएफसी आणि पेज इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे.
मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही १७.२५ लाख कोटी रुपयांच्या मूल्यासह देशातील सर्वात मौल्यवान सूचिबद्ध कंपनी ठरली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस दुसरी आणि एचडीएफसी बँक भारतातील तिसरी सर्वात मौल्यवान सूचिबद्ध कंपनी आहे. अदानी टोटल गॅस आणि अदानी एंटरप्रायझेस या यादीत गौतम अदानी यांच्या दोन कंपन्या आहेत. या यादीत २१० कंपन्या अशा आहेत, ज्या व्यावसायिक मुख्य कार्यकारी अधिकारी चालवत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सॉफ्टवेअर आणि सेवा क्षेत्राला एकूण सहा लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या यादीनुसार ऊर्जा, किरकोळ व्यवसाय, हॉटेल, रेस्टॉरंट आणि संबंधित क्षेत्रे आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील कंपन्यांमध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. सरकारी कंपन्यांबद्दल बोलायचे तर, स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वाधिक १४% वाढीसह क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. यासोबतच पॉलिसी बाजार, पेटीएम, झोमॅटो आणि न्याकासारख्या स्टार्टअप्सचे मूल्यांकनही कमालीचे खाली आले आहे. २.१९ लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह या यादीत लस निर्माता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मौल्यवान असूचिबद्ध कंपनी आहे.
६६४ महिला संचालक मंडळात सामील, अपोलोमध्ये सर्वाधिक ६ ५०० सर्वात मौल्यवान कंपन्यांमध्ये संचालक मंडळाच्या १६% पदांवर महिला आहेत. या कंपन्यांमध्ये ६६४ महिलांचा संचालक म्हणून समावेश आहे. अपोलो हॉस्पिटल एंटरप्रायझेसने सर्वाधिक सहा महिला संचालकांची नियुक्ती केली आहे, तर गोदरेज कंझ्युमर्स, पिरामल आणि इंडिया सिमेंट्सने अनुक्रमे पाच महिला संचालकांची नियुक्ती केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.