आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेलगू देसम पार्टी टीडीपीचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव (एनटीआर) यांची कन्या उमा माहेश्वरी यांनी सोमवारी आत्महत्या केली. त्या 52 वर्षांच्या होत्या. हैदराबादमधील जुबली हिल्स परिसरात त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया रुग्णालयात पाठवला.
ही बातमी मिळताच आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश तत्काळ उमा यांच्या घरी पोहोचले. उमा या चंद्राबाबूंच्या मेहुणी होत्या. चंद्राबाबूंचा विवाह एनटीआर यांची दुसरी कन्या नारा भुवनेश्वरी यांच्याशी झालाय.
आजारपणाने त्रस्त असलेल्या उमा नैराश्याशी झुंज देत होत्या
एसीपी एम सुदर्शन यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमा माहेश्वरी गेल्या काही दिवसांपासून आजारांनी त्रस्त होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी त्या त्यांच्या बेडरुममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पहिल्या नवऱ्याचे अफेअर होते, मानसिक त्रास द्यायचा
उमा माहेश्वरी यांचे आयुष्य अडचणीत गेले होते. त्यांचे लग्न नरेंद्र राजन यांच्याशी झाले होते. मात्र त्यांचे दुसऱ्या महिलांसोबत अफेअर होते. एवढेच नाही तर ते उमा यांना मारहाणही करायचे. जेव्हा एनटीआर यांना याबाबत समजले होते, तेव्हा त्यांनी नरेंद्र यांना इशारा दिला होता, पण तरीही त्यांच्या वागण्यात फरक पडला नव्हता.
यानंतर एनटीआर यांनी उमा यांना नरेंद्रपासून घटस्फोट मिळवून दिला आणि त्यांचे दुसरे लग्न कृष्णा जिल्ह्यातील कंठमनेनी श्रीनिवास प्रसाद यांच्याशी लावून दिले होते.
चंद्राबाबूंनी टीडीपीमध्ये बंड केले, काही महिन्यांनी एनटीआर यांचे निधन झाले
एनटीआर यांनी 1982 मध्ये तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) ची स्थापना केली. त्यांनी तेलुगू जनतेच्या स्वाभिमानाचा नारा दिला होता. 9 महिन्यांत निवडणुका झाल्या आणि एनटीआरचा पक्ष सत्तेवर आला होता. त्यानंतर अविभाजित आंध्रमधील काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली. एनटीआर यांचे 1996 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पक्षात बंडखोरी होऊन काही महिन्यांनी ही घटना घडली होते. हे बंड त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी केले आणि एनटीआर यांच्याकडून अधिकार काढून घेतले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.