आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा-महाविद्यालयांत हिंदुत्व शिकवा:रायपूरमध्ये संघाची बैठक, डॉ. मनमोहन म्हणाले - काँग्रेसच्या बापजाद्यांनीही संघाचा तिरस्कारच केला

रायपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉक्टर मनमोहन वैद्य यांनी काँग्रेसची भारत जोडो यात्रा व सोशल मीडियावर संघाविरोधात करण्यात आलेल्या पोस्टवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले - काँग्रेस नेत्यांच्या बापजाद्यांनीही नेहमीच संघाचा तिरस्कार केला. पण संघ वाढला. कारण, त्याने कायम देशासाठी सत्याच्या सिद्धांतावर काम केले.

रायपूरमध्ये गत 3 दिवसांपासून संघाची बैठक सुरू आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह संघाच्या विचारधारेंतर्गत काम करणाऱ्या देशातील 36 संघटनांचे 250 हून अधिक प्रमुख व्यक्तीही या बैठकीला हजर होते. या बैठकीचा सोमवार समारोप झाला. त्यानंतर विमानतळ परिसरातील मानस भवनात झालेल्या बैठकीत संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी महत्त्वाची माहिती दिली.

सरसंघचालक मोहन भागवत यांनीही या बैठकीला मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी भविष्यात देशात सकारात्मक बदल होण्यावर काम करण्यावर भर दिला. विशेषतः देशातील शाळा व महाविद्यालयांत हिंदुत्व शिकवण्यावर त्यांनी जोर दिला. वैद्य यांनी याची पुष्टी केली. ते म्हणाले -देशाच्या विद्यापीठांत हिंदुत्वाचे शिक्षण दिले जावे हे बैठकीत ठरवण्यात आले. अमेरिका व ब्रिटनमध्येही हिंदुत्वाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. भारतातही असे झाले पाहिजे. जीडीपीऐवजी भारतीय मापदंड इन्डेक्स तयार करण्याचाही विचार झाला पाहिजे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी 3 दिवस ही बैठक घेतली.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी 3 दिवस ही बैठक घेतली.

या मुद्यांवर काम करणार संघ व त्याच्याशी संबंधित संघटना

  • ब्रँडेड वस्तू चांगल्या मानण्याच्या फॅशनमुळे स्थानिक कामगारांच्या उत्पादनाचे नुकासन होते. त्यामुळे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे.
  • जीडीपीऐवजी भारतीय मानक इन्डेक्स तयार करण्यावरही विचार झाला.
  • सेंद्रिय शेती, शेतकरी मजूर व्यापाऱ्यांना सोबत घेऊन चालणे, कृषी पदवीधर शेती करत नाहीत, जे करतात ते निरक्षर असतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर काम व्हावे.
  • भारतीय न्यायालयांत भारतीय भाषांत काम व्हावे. जजमेंट भारतीय भाषेत असावे. वकील व न्यायाधीश काय बोलत आहेत हे जनतेला समजले पाहिजे.
  • मागास वर्गाच्या नागरिकांचे स्थलांतर रोखण्यात यावे.
  • भारत हिंद राष्ट्र घोषित व्हावा काय? या प्रश्नाला उत्तर देताना सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले की, राष्ट्र म्हणजेच समाज. त्यामुळे येथील समाज हिंदूच आहे.
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा या बैठकीसाठी रायपूरच्या दौऱ्यावर आले होते.
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा या बैठकीसाठी रायपूरच्या दौऱ्यावर आले होते.
बैठकीला पोहोचलेले संघाचे पदाधिकारी.
बैठकीला पोहोचलेले संघाचे पदाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...