आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तराखंड:शिक्षक सरोज यांनी मुलांना शिकवता यावे म्हणून वर्गात बनवला जगाचा नकाशा, पुस्तकाशिवाय सोपा झाला अभ्यास

अल्मोडा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिक्षकांना अॉनलाइन वर्गात मुलांना शिकवण्यात येत होती अडचण

उत्तराखंडातील शासकीय शिक्षक आर. डी. सरोज. पुस्तकांशिवाय शिकवणे सोपे जावे म्हणून त्यांनी मुलांना भूगोल शिकवण्यासाठी शाळेतच पूर्ण जगाचा नकाशा बनवला. सरोज अल्मोडातील ताकुला भागात गणानाथ इंटर महाविद्यालयात शिकवतात. सरोज सांगतात, अल्मोडाची लोकसंख्या सुमारे ३८ हजार आहे. मात्र, डोंगराळ भागातील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या खूप कमी आहे. तशातच पालकांनी शासकीय शाळांमध्ये मुलांना पाठवणे जवळपास बंद केले आहे. तिकडे कोरोनामुळे शाळा बरेच दिवस बंद होती. मात्र, ऑनलाइन वर्ग सुरू झाल्यानंतर शिकवण्यात पुस्तकांमुळे अडचणी आल्या. बहुतांशी मुलांकडे पुस्तके नव्हती. ज्यांच्याकडे होती त्यांना समजावणे कठीण जात होते. यामुळे वर्गातच जगाचा नकाशा बनवण्याचा विचार आला. त्यानंतर वर्गात प्रमुख देशांचे नकाशे, सौरमंडळ, डोंगर- पठार तसेच अनेक चित्र बनवली. नकाशा व चित्रांच्या मदतीने आता मुलांना शिकवण्यासाठी पुस्तकांची गरज भासत नाही. मुले लगेच शिकतात. स्थानिक लोक सांगतात की, शिक्षक सरोज यांचे परिश्रम बघून पालक खूष आहेत.

शाळेच्या सुटीनंतर रिकाम्या वेळेत स्वत:च्या खर्चाने केली पेंटिंग
आर. डी. सरोज यांनी सांगितले, नकाशा बनवण्यासाठी त्यांना जवळपास एक महिना लागला. ते शाळा सुटल्यानंतर घरी न जाता अनेक तास नकाशा बनवत राहायचे. त्याचा खर्चही स्वत:च केला. तर आता गणानाथ इंटर महाविद्यालयाचे २०० पेक्षा जास्त विद्यार्थी या नकाशांच्या मदतीने भूगोलाचा अभ्यास करतात.

बातम्या आणखी आहेत...