आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानच्या मनोहरथाना भागातील सुमारे १५०० लोकसंख्येचे गुराडी गाव स्वावलंबनाचे उत्तम उदाहरण आहे. गेल्या दीड दशकात ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्नांतून गावाचे चित्र आणि नशीब दोन्ही पालटले. आता गावात मसाले, वॉशिंग पावडर व सिमेंटसह अनेक प्रकारचे उद्योग आहेत. ग्रामस्थ सांगतात की, आधी गुराडीमध्ये रोजगार नव्हता. यामुळे लोक कोटा, कैथून, बुंदी, भिलवाडा व जयपूरला जाऊन मजुरी करत होते. गावातील बहुतांश घरे बंदच राहायची. केवळ सणासुदीच्या काळातच लोक येथे येत असत.
गावचे शिक्षक रमेश शर्मा आणि राधेश्याम लोधा यांनी समस्या जाणून घेतली. त्यांनी गावातील लोकांना छोटे उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास सांगितले. यासाठी पैशांची गरज होती. शिक्षकांनी यासाठी १५ ग्रामस्थांची समिती स्थापन केली. याच्या माध्यमातून गावातील लोकांकडूनच पैसा घेण्यात आला. त्या बदल्यात जमा असलेल्या रकमेच्या हिशेबाने व्याज देणे सुरू केले. कोणीही उद्योग वा व्यवसायासाठी समितीत २% व्याजाने कर्ज घेऊ शकत होता. हळूहळू अशा ५ समित्या स्तापन झाल्या. प्रत्येक समितीकडे सुमारे २ कोटी रुपये रक्कम जमा आहे. याच रकमेतून ग्रामस्थांना फायदा होत आहे.
सुरुवातीला लोकांनी किराणा, रेस्टॉरंट व कापडाची दुकाने उघडली. वेळेवर पैसा जमा व्हायला लागल्याने समितीची अार्थिक स्थितीही बळकट व्हायला लागली. यानंतर खूर्ची तयार करण्यासारखे छोटे उद्योगही सुरू झाले. जगमोहन साहू, बद्रीलाल व मांगीलाल म्हणतात, मोलमजूरीसाठी आम्ही शेजारच्या गावात जात होतो. आता तर पिपलादी, जालमपुरा, कंडारी, झीरी, आवलहेडा, बिसलाईसह इतर गावातील लोक येथे येऊन काम मागत आहेत. सरपंच रामकिशन लोधा म्हणतात, गावात कोणीच बेरोजगार नाही. सर्व कोणत्या ना कोणत्या कामात गुंतले आहेत. समित्यांमुळेच या गावाचा कायापालट झाला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.