आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण:दरवर्षी 16 लाखांहून अधिक विद्यार्थी घेतात प्रवेश, वैद्यकीयकडे मुलींचा कल जास्त, नीट क्रॅक करण्यातही पुढे

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जवळपास १० हजार संस्था आहेत.

तांत्रिक व व्यवस्थापनासारख्या व्यावसायिक शिक्षणासाठी देशात आयआयटी व आयआयएमसारख्या शासकीय संस्थांची नावे घेतली जात असली तरी तरुणांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी शासकीय संस्थांची संख्या खूप कमी आहे.

अजूनही अभियांत्रिकी, व्यवस्थापनसारख्या तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना खासगी संस्थांवर अवलंबून राहावे लागते. देशात तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय संस्थांची संख्या १९५९ आहे, तर खासगी संस्थांची संख्या ७४०० पेक्षा जास्त आहे. शासकीय संस्थांमध्ये ३.२० लाख विद्यार्थी आहेत, तर खासगी संस्थांमध्ये १२ लाखांपेक्षा जास्त.

देशात तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जवळपास १० हजार संस्था आहेत. एआयसीटीईच्या आकडेवारीनुसार सध्या त्यात सुमारे १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. शासकीय तांत्रिक संस्थांमध्ये जवळपास ४.७ लाख जागा आहेत, तर खासगी संस्थांमध्ये ही संख्या २५.२१ लाख आहे. म्हणजे पाचपट जास्त. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाच्या बाबतीत देशात अजूनही अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमांनाच प्राधान्य दिले जाते. व्यवस्थापन दुसऱ्या स्थानावर, तर फार्मसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. यातही आयटी व संगणकाशी संबंधित अभ्यासक्रमांची मागणी जास्त आहे.

वैद्यकीयकडे मुलींचा कल जास्त, नीट क्रॅक करण्यातही पुढे
५६२ वैद्यकीय महाविद्यालयांत तयार होतात १.२५ लाख डॉक्टर
देशात डॉक्टरकी शिकण्यात मुली या मुलांच्या पुढे आहेत. नीट २०२० प्रवेश परीक्षेत जवळपास १६ लाख विद्यार्थी बसले. परीक्षेसाठी ८.८० लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील ४.२७ लाख विद्यार्थिनी पात्र ठरल्या. कल पाहिल्यास वैद्यकीयसाठी प्रवेशाला पात्र ठरणाऱ्या मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त होत आहे.

आरोग्य संस्थांच्या बाबतीत दक्षिणेतील ६ राज्ये व यूपी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी तसेच महाराष्ट्राचा दबदबा कायम आहे. देशात एकूण ८३ हजारांपेक्षा जास्त एमबीबीएस जागा आहेत. या सात राज्यांत देशातील एकूण एमबीबीएस जागांचा ४८% वाटा आहे. एकूण ५६२ वैद्यकीय महाविद्यालयांपैकी २७६ खासगी आहेत. विशेष म्हणजे या खासगी महाविद्यालयांपैकी १६५ या सात राज्यांतच आहेत. बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचलसारख्या राज्यातील सुमारे ६५ कोटी लोकसंख्येला जागांची उपलब्धता अवघी ३०% आहे.

बातम्या आणखी आहेत...