आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Team Of Doctors Of SMS Hospital Showed By Live Demo In Dainik Bhaskar Office Nothing Like Magnetic Power, Even Gravity Force Is Not Able To Pull; News And Live Updates

लसीकरणानंतर नाणी चिकटण्याचा दावा खोटा:चुंबकीय शक्तीमुळे नव्हे तर घामामुळे चिकटतात नाणी - डॉक्टर; एसएमएसच्या डॉक्टरांनी दैनिक भास्करच्या कार्यालयात दिला लाईव्ह डेमो

जयपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घामाच्या ग्रंथींबरोबर इतर पदार्थ देखील बाहेर पडतात, त्यामुळे कोणतीही गोष्ट सहजपणे चिकटतात

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या जात आहे. कोरोनावर एकमेव उपाय म्हणून लसीकरणाकडे बघितले जात आहे तर दुसरीकडे यामुळे लोकांचा मृत्यू होत असल्याचा दावादेखील करण्यात आला होता. परंतु, आता लसीकरणानंतर शरिरात चुंबकीय शक्ती निर्माण होत असल्याचा दावा करण्यात येतोय. सर्वात आधी हे प्रकरण महाराष्ट्र आणि दिल्लीतून समोर आले होते. यामुळे शरिरावर नाणी, आणि भांडी चिकटत असल्याचा व्हिडिओदेखील शेअर केला जात आहे. परंतु, हे लसीकरणामुळे होत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

संबंधित प्रकरणात दैनिक भास्करच्या डिजिटल टिमने राजस्थानधील सर्वात मोठे हॉस्पिटल असलेल्या एसएमएसमधील डॉक्टरांच्या एका पथकाला आपल्या कार्यालयात बोलावले. संबंधित डॉक्टरांकडून हे कसे होत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी लाईव्ह डेमोव्दारे नाणी कशी चिकटतात हे दाखवले. त्यासोबतच लसीकरणामुळे शरिराला नाणी किंवा इतर कोणतेही साहित्य चिकटण्याचा दावा खोटा असल्याचा डॉक्टरांच्या पथकाने म्हटले आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, जर लसीकरणामुळे शरिरात चुंबकीय शक्ती निर्माण झाली असती तर लोखंडासारखे धातू शरिराकडे आकर्षित झाले असते व गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणामदेखील पाहायला मिळाला असता. शरिरावर चिकटणाऱ्या नाणी, भांडी किंवा इतर साहित्य हे चुंबकीय शक्तीमुळे होत नसून हे शरिरातील घामामुळे होत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

कोरोनापासून फक्त लसीकरण वाचवेल
डॉक्टरांनी लाईव्ह डेमो करत असताना काही आश्चर्यकारक परिणाम समोर आले. दरम्यान, ज्या लोकांनी लस घेतली आणि ज्यांनी घेतली नाही, अशा सर्व लोकांच्या शरिरावर नाणी आणि इतर लोखंडाच्या वस्तू चिकटल्या. परंतु, शरिरावरील घाम पुसल्यावर त्या सर्व वस्तू खाली पडायला लागल्या. डॉक्टरांच्या पथकाने सांगितले की, जर लसीकरणामुळे माणसाच्या शरिरात चुंबकीय शक्ती निर्माण झाली असती तर या वस्तू खाली पडल्याच नसत्या. त्यामुळे जर कोरोनापासून वाचायचे असेल तर लसीकरण हा एकच मार्ग असल्याचे डॉक्टरांच्या पथकाने सांगितले.

तज्ञ पॅनेलचा दावाः लस आणि चुंबकीय उत्पादन भिन्न
एसएमएस हॉस्पिटलचे डॉ. दीपक सतनानी म्हणाले की, लसीकरणामुळे तुमच्या शरिरातील कोरोना विषाणू नाहीसा होतो. लसीमुळे शरिरात अँटीबॉडी बनत असून यामुळे आपल्याला कोरोनाविरुद्ध लढण्याची ताकद मिळते. अँटीबॉडी शरिरात कोणत्याही प्रकारे चुंबकीय शक्ती निर्माण करत नसल्याचे सतनानी यांनी म्हटले. या सर्व अफवा असून लस बाजारात येण्यापूर्वी चार चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जर लसीकरणामुळे असे काही घडले असते तर जगात एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले नसते.

डॉ. चैतन्य यांनी सांगितले की, लसीकरणामुळे चुंबकीय शक्ती होणे हे पूर्णपणे निराधार आहे. कारण चुंबकीय शक्तीचा लशीशी काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. पीआयबीने यासंदर्भात एक लेख प्रसिद्ध केला असून त्यातही त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. डॉ. प्रणव म्हणाले की, लस ही शरिरात रोग प्रतिकारकशक्ती आणि अँटीबॉडी तयार करीत असते. डॉ. हेमांद्र पाटीदार म्हणाले की, घामामुळे शरिरावर वस्तू चिकटत असतात. लस हे एक जैविक उत्पादन असून लोखंड चुंबक आहे. त्यामुळे ते दोघे एकत्र कसे काम करतील? कोरोना लसीकरणाबाबत या अफवा असून हे घामामुळे होत असल्याचे डॉ. संजू यांनी सांगितले.

घामाच्या ग्रंथींबरोबर इतर पदार्थ देखील बाहेर पडतात, त्यामुळे कोणतीही गोष्ट सहजपणे चिकटतात
बीकानेरचे आरोग्य अधिकारी डॉ. नवल गुप्ता यांनी सांगितले की, आपल्या शरीरात घामासाठी ज्या घामाच्या ग्रंथी असतात त्यामधून घामासह इतर पदार्थदेखील बाहेर येतात. त्यामुळे त्यासोबत नाणी किंवा इतर वस्तू सहजपणे चिकटतात. आपल्याला असे वाटते की, हे चुंबकीय शक्तीमुळे होत असेल परंतु, वास्तवात तसे काहीही नसते. असे वाटते की चुंबकीय क्षेत्र विकसित झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...