आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लखनऊ:छेड, बलात्कारातील गुन्हेगारांचे भरचौकात पोस्टर लावणार! यूपी सरकारची घोषणा, तपासासाठी ‘ऑपरेशन दुराचारी’

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्या ठाण्याअंतर्गत गुन्हे, तेथील स्टाफ जबाबदार

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी धडक निर्णय घेतला आहे. महिलांची छेड काढणे, लैंगिक गुन्हे किंवा बलात्काराच्या प्रकरणातील सराईत गुन्हेगारांचे आता भरचौकात पोस्टर लावण्यात येणार आहेत. सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांत चौकशीसाठी “ऑपरेशन दुराचारी’ सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच महिला पोलिस कर्मचाऱ्यांना कठोर कारवाई करण्यास सांगितले जावे, त्यांची नावे आणि फोटो क्रॉसिंगवर चिकटवण्यात यावीत, असेही निर्देश दिले आहेत.

ज्या ठाण्याअंतर्गत गुन्हे, तेथील स्टाफ जबाबदार
अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलांविरुद्ध गुन्ह्याची घटना घडली तर बीट प्रभारी, चौकी प्रभारी, ठाणे प्रभारी व सर्कल अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल. अँटी-रोमिअो स्क्वॉडला अधिक सक्रिय व मजबूत करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री योगींनी दिले आहेत.