आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रिलायंस एजीएम:जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गूगल करणार 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक, कंपनीला मिळेल 7.7 % भागीदारी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक कंपनी गूगल (Google) रिलायंस इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्म्स (jio platforms limited)मध्ये भागीदारी खरेदी करण्यासाठी करणार आहे. अमेरिकन कंपनी गूगल जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. ही माहिती आज रिलायंसच्या एजीएममध्ये रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी दिली.

जिओमधील दुसरी सर्वात मोठी गुंतवणूक

जिओला मिळणारी ही 14वी आणि दुसरी सर्वात मोठी गुंतवणूक आहे. यापूर्वी फेसबुकने 43 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जिओमध्ये केली आहे.रिलायंस इंडस्ट्रीजने एप्रिलपासून आतापर्यंत जिओमधील भागीदारी विकून आणि राइट्स इश्यूला मिळून 2.04  लाख कोटी रुपये मिळवले आहेत.

फेसबूकने सर्वात आधी जिओमध्ये गुंतवणूक केली होती

मागील 12 आठवड्यात रिलायंस जिओला 13 गुंतवणूक मिळाल्या आहेत. फेसबुकने 22 एप्रिलला सर्वात आधी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक केली होती. फेसबुकने जिओमध्ये 9.99 टक्के भागीदारी खरेदी करुन 43 हजार कोटी रुपये गुंतवले होते. यानंतर सिल्वर लेक, विस्टा इक्विटी, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबाडलानेही जिओमध्ये गुंतणूक केली होती. नुकतंच अबू धाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटी (एडीएआई), टीपीजी, एल कॅटरटन, पीआईएफ आणि इंटेलनेही गुंतवणूकीची घोषणा केली आहे.

गूगल भारतात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल

गूगलने सोमवारी भारतात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक इक्विटी इनवेस्टमेंट, पार्टनरशिप आणि ऑपरेशनल इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे केली जाईल. गूगल फॉर इंडिया इवेंटमध्ये कंपनीचे सीईओ सुंदर पिचाईने म्हटले की, भारताच्या डिजिटलीकरणशी संबंधित घोषणांबाबत कंपनी उत्साहित आहे.