आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अनोखे:अभियंते, डॉक्टरांना सुचली नवी संकल्पना; अॅपद्वारे ऑक्सिजन, खाटांची केली जाते सोय

मनीषा भल्ला | बंगळुरू3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगळुरूत कोरोना रुग्णांवर तंत्रज्ञानाद्वारे उपचार

बंगळुरूत तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोनाशी लढण्याचा अनोखा उपाय शोधला आहे. शहरात वाढत्या रुग्णांच्या मदतीसाठी ४० पेक्षा जास्त एनजीओ नागरी संस्थेचे लोक मर्सी मिशनच्या नावाने एकत्र आले आहेत. यात शिक्षणतज्ञ, वैद्यकीय व आयटी व्यावसायिक, अभियंते, तंत्रज्ञ व चालक सहभागी आहेत. त्यांनी ‘मर्सी क्लिनिक’ नावाने अॅप बनवले आहे. यात बेड उपलब्ध असल्याचा शोध घेण्याबरोबरच ऑक्सिजन सिलिंडर मागवले जाऊ शकते. या व्यवस्थेत ५० पेक्षा जास्त डाॅक्टर आणि २ हजार व्हॉलेंटियर काम करत आहेत. डॉक्टरांनी ऑनलाइन क्लिनिक सुरू केले, यातून आतापर्यंत १० हजारापेक्षा जास्त रुग्णांची मदत करण्यात आली.

आणखी एक डॉक्टर्स फॉर ह्युमेनिटीत ४५ डॉक्टर काम करताहेत. ते युरॉलॉजिस्ट डॉ. बेलगामी मोहंमद साद यांच्या नेतृत्वात सुरू झाले आहे. या गटाने वसाहती व सार्वजनिक ठिकाणांना कोविड केंद्रात रूपांतरित करत १५० खाटांची सोय करण्यात आली आहे. मिशन रुग्णांना हायफ्लो ऑक्सिजन सिलिंडरही उपलब्ध करुन देत आहे. गुजरातमधून असे २०० सिलिंडर विकत घेतले आहेत, जे आतापर्यंत ८०० रुग्णांच्या कामी अाले आहेत. शहरात तीन सिलिंडर बँकाही बनवल्या आहेत.