आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Teenager Gang Raped In Bettiah; 3 Including Khalasi Did Dirty Work; Condition Critical

बिहारमध्ये 16 वर्षीय मुलीवर बसमध्ये गँगरेप:बस निर्जन ठिकाणी थांबवली; चालक-कंडक्टरसह 3 जणांनी केला बलात्कार

बेतियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या बेतिया मध्ये एका 16 वर्षीय मुलीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. ड्रायव्हर-कंडक्टरसह तिघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीची प्रकृती सध्या गंभीर आहे. तिच्यावर पोलिस सुरक्षेत उपचार सुरू आहेत. घटना बेतिया बसस्थानकापासून 100 मीटर अंतरावर घडली आहे.

पीडित मुलगी मंगळवारी दुपारी मोतिहारीहून बेतिया (चनपटीया) येथे परतत होती. यादरम्यान बस कंडक्टरने तिला गुंगीचे औषध दिले होते. पीडितेने सांगितले की, संध्याकाळी उशिरा बेतिया बस स्टँडवर आल्यानंतर सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. चालक गाडी घेऊन स्टँडपासून सुमारे 100 मीटर अंतरावर गेला आणि एका निर्जन ठिकाणी बस थांबवली.

या बसमध्ये मुलीवर बलात्कार करण्यात आले.
या बसमध्ये मुलीवर बलात्कार करण्यात आले.

यानंतर चालक, कंडक्टरसह 3 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. ती बेशुद्ध पडल्यावर तिघे बस सोडून पळून गेले. यानंतर पोलिसांची पेट्रोलिंग गाडी रस्त्यावरून जात होती. संशयावरून पोलिसांनी बसची झडती घेतली असता मुलगी गंभीर अवस्थेत आढळून आली.

त्यानंतर पोलिसांनी पीडितेला रुग्णालयात नेले. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने आपली आपबिती सांगितली. बसमध्येच नशा करून बसचालक, कंडक्टरने व इतरांनी गैरकृत्य केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले आहे.

याप्रकरणी बेतिया सदरचे एसडीपीओ मुकुल परिमल पांडे यांनी या घटनेला दुजोरा दिला. मुलीवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी रात्री छापा टाकून आरोपी चालक व हेल्परला ताब्यात घेतले आहे. तिसऱ्या आरोपीच्या शोधात पोलिस छापेमारी करत आहेत. पोलिसांनी बस ताब्यात घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...