आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारचे वन आणि पर्यावरण मंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांचे सामान वाराणसीतील एका हॉटेलने फेकून दिले. शुक्रवारी रात्री एक वाजता हॉटेलच्या रिसेप्शनवर त्यांचे सामान त्यांना न सांगता ठेवण्यात आले. त्यावेळी तेज प्रताप आपल्या मित्रांसोबत अस्सी घाट येथे फिरण्यासाठी गेले होते. ते हॉटेलवर परतल्यावर त्यांना सामान बाहेर पडलेले दिसले. यानंतर तेज प्रताप यांचे स्वीय सहाय्यक मिशाल सिन्हा यांनी याप्रकरणी सिग्रा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
तेज प्रताप यादव आपल्या खासगी दौऱ्यावर वाराणसीत आले होते. हॉटेलचालकाच्या या कृत्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. ही घटना वाराणसीच्या सिग्रा भागातील अरकेडिया हॉटेलमधील आहे.
आता काही फोटो बघा...
आता जाणून घ्या हॉटेल व्यवस्थापनाची बाजू
मंत्र्यांच्या नावाने रूम क्रमांक 205 आणि 206 बुक करण्यात आल्याचे हॉटेल व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजता मंत्र्यांना खोली रिकामी करायची होती, मात्र त्यांनी खोली रिकामी केली नाही. चेन्नईहून आलेल्या पाहुण्याने रूमचे ऑनलाइन बुकिंग केली होती. ते हॉटेलवर पोहोचले.
हॉटेल व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, आम्ही त्याचे सामान मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांसमोर दुसऱ्या खोलीत हलवत होतो. यावर ते संतापले. दोघेही खोलीतून निघून गाडीत बसले. आज सकाळपर्यंत मंत्र्यांची खोली त्यांच्या नावावर बुक होती, मात्र ते रात्रीच निघून गेले. मंत्री कंफ्यूज झाल्याचे हॉटेल व्यवस्थापनाचे म्हणणे आहे..
तक्रारीची प्रत वाचा...
तक्रारीत काय म्हटले आहे?
मंत्री तेज प्रताप 206 क्रमांकाच्या खोलीत राहत होते, असे तक्रारीत म्हटले आहे. रुम 205 च्या शेजारी त्यांचे सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक होते. सकाळी 11 वाजता ते अस्सी घाट येथे मंदिर दर्शन आणि गंगा आरतीसाठी निघाले. मध्यरात्री 12 वाजता ते परत आले तेव्हा त्यांचे सामान रिसेप्शनवर ठेवण्यात आले होते.
मंत्र्यांचा कक्ष 206 परवानगी न घेता उघडण्यात आला. जे त्यांच्या सुरक्षेसाठीही धोकादायक आहे. यावेळी त्यांचा एक कर्मचारी दिलावरही उपस्थित होता. त्याला रुम क्रमांक 205 मधून बाहेर काढून रिसेप्शनवर बसवण्यात आले. हे काम नियमाविरुद्ध आहे. ताबडतोब कारवाई करण्यात यावी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.