आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव बुधवारी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी ही बैठक सुरू आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या बैठकीनंतर नितीश कुमार यांना उत्तर प्रदेशमध्ये UPAचे संयोजक बनवले जाऊ शकते, अशी चर्चा सद्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भेटीनंतर नेत्यांनी घेतली पत्रपरिषद
नितीश कुमार म्हणाले की, आमच्या विरोधी ऐक्याबाबत चर्चा झाली आहे. जास्तीत जास्त पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. तर राहुल गांधी म्हणाले की, नितीशजींचा पुढाकार खूप चांगला आहे. विरोधकांना एकत्र करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. विचारधारेची लढाई लढत राहणार. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे बिहार अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह उपस्थित होते.
नितीश कुमार तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर
नितीश कुमार तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल म्हणजेच मंगळवारी मीसा भारती यांच्या दिल्लीतील घरी लालू यादव यांची भेट घेतली होती. तर आज त्यांनी तेजस्वी यादव आणि त्यांची पत्नी राजश्री यांची भेट घेतली. त्यांनी नुकत्याच जन्म झालेल्या कात्यायनी या चिमुकलीची देखील भेट घेतली. तिला कडेवर घेत तिचे लाड केले.
काँग्रेसला सोबत घेण्याचे सांगत आहेत नितीश कुमार
आज या नेत्यांची भेट देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात आहे. आज विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत काही पाऊल उचलले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. नितीशकुमार हे यापूर्वीही विरोधी ऐक्याचे समर्थक राहिले आहेत. यापूर्वीही ते काँग्रेसला सोबत घेण्याचे बोलले होते.
काही विरोधी पक्ष त्यांच्या प्रस्तावाच्या विरोधात आहेत. आरजेडी आणि काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, नितीश कुमार UPA ची ताकद वाढवू शकतात. तर अनेक विरोधी पक्षांना काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी राजी करू शकतात. जोपर्यंत पंतप्रधानांच्या दाव्याचा संबंध आहे, नितीश यांनी आधीच सांगितले आहे की, ते पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत आणि निर्णय काहीही असो, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच PM पदाची निवड केली जावी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.