आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील चिल्लामत्तरू लगतचे गाव- टेकुलोडू. २०१४ मध्येच टेकुलोडू आदर्श व आत्मनिर्भर म्हणून ‘प्रोटो व्हिलेज’ च्या रुपाने ओळख केली. ते देशातील पहिले असे गाव आहे, ज्याने भाेजन, पाणी, वीजेसारख्या गरजांसाठी आत्मनिर्भर मॉडल तयार केले आहे, तेही पर्यावरण रक्षणासह. कोरोना काळात गावात बाहेरच्यांना यायला घातलेली बंदी जानेवारीपासून हटवण्यात आली. आता गावकऱ्यांनी आत्मनिर्भर होण्याची कहाणी लाेकांना पुन्हा सांगण्यास सुरू केले आहे. अट एकच की, येथे येणाऱ्यांनी काही तरी शिकून जावे.
भेट देणाऱ्यांना येथे ३०० रुपये रोजचे शुल्क देऊन राहता येईल. मात्र, पर्यटकांऐवजी त्या लोकांना प्राधान्य दिले जाते जे येथे काही दिवस थांबून खऱ्या अर्थाने काही तरी शिकतील. जर एखाद्याला जास्त काळ रहायचे असेल तर त्याला स्वयंसेवक म्हणून सेवा करावी लागेल. तेव्हा त्याच्याकडून शुल्क घेतले जात नाही. गाव आत्मनिर्भर करणारे कल्याण अक्कीपेड्डी सांगतात की, ही पद्धत शंभर टक्के यशस्वी आहे. यामुळे आम्हाला वेगवेगळ्या लाेकांचे वैशिष्ट्ये प्राप्त होते. एखादा स्वयंसेवक मुलांना कोडिंग शिकवून देतो, एखादा गणित व अभियांत्रिकी. येणाऱ्या प्रत्येकाकडून गावकरी काही तरी नक्कीच शिकतात. गाव आज पवनऊर्जेतून आपल्या गरजेपुरती वीज तयार करते. रेन हार्वेस्टिंगद्वारे पाणी वाचवून वापरात आणले जाते. शेतीसोबत गाय- शेळी, कोंबडी, मासे पालनही करतात. जैविक शेतीसाठी कम्पोस्ट व वुड काँक्रिट पॅनलने पर्यावरणपूरक घरही बनवतात. कल्याण ज्या घरात राहतात ते बांबू आणि लाकडाचे आहे.
गावात येणारा प्रत्येक पाहुणा, स्वयंसेवक मुलांना शिकवतो
पर्यावरण रक्षणामुळे गावातील मुलांना ५० पेक्षा जास्त प्रकारच्या चिमण्या आणि झाडांची नावे तोंडपाठ आहेत, कारण ते त्यांच्या दिनचर्येचा भाग आहे. इंग्रजीत बोलणारी मुले ओपन स्कूल सिस्टममध्ये येणारे पाहुणे, स्वयंसेवककाडून कोणत्या वर्गात न विभागता शिकतात. शिक्षण मंडळासाठी आंतरराष्ट्रीय मंडळ आयजीसीएससीची निवड करण्यात आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.