आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनमध्ये मनमानी:तेलंगणाने महाराष्ट्र, आंध्रातून आलेल्या लोकांना केली मनाई

हैदराबादएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
विजयवाडा येथे पोलिसांनी चेन्नईहून आलेल्या मजुरांना रोखले - Divya Marathi
विजयवाडा येथे पोलिसांनी चेन्नईहून आलेल्या मजुरांना रोखले
  • लॉकडाऊनमध्ये दक्षिणेतील राज्याची मनमानी

तेलंगणा सरकारने महाराष्ट्र, गुजरात व आंध्र प्रदेशातून आपल्या राज्यात प्रवेश करणाऱ्यांना मनाई केली आहे. पुढील आदेशापर्यंत या तीन राज्यांतून आलेल्या लोकांना पुढील प्रवासासाठी पास देण्यासही मनाई केली आहे. दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे रविवारी पोलिसांनी चेन्नईहून आलेल्या परराज्यातील मजुरांना रोखले.हे मजूर मूळचे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व ओडिशातील असल्याचे सांगण्यात येते. हे लोक सायकलने प्रवासावर निघाले आहेत. पोलिसांनी त्यांची येथे भोजन व विश्रांतीची व्यवस्था केली आहे.

आणखी ६ कर्मचारी बाधित

दिल्लीच्या हिंदू राव रुग्णालयातील आणखी ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ते सर्व एका कोरोना बाधिताच्या संपर्कात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या रुग्णालयात आतापर्यंत १८ आरोग्य कर्मचारी बाधित आढळून आले आहेत. जवळपास निम्मा कर्मचारी वर्ग क्वाॅरंटाइनमध्ये पाठवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...