आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैदराबादमधील भाजपचे निलंबित आमदार टी राजा यांना पोलिसांनी अटक केली आहे. ते हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात भाग घ्यायला चालले असताना पोलिसांनी त्यांना खबरदारी म्हणून ताब्यात घेतले. मंगलहाट पोलिसांनी त्यांना अटक केली आणि लगेच त्यांना बोलाराम पोलिस ठाण्यात स्थानांतरित करण्यात आले. टी राजा यांनी त्यांच्या अटकेच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मी दरवर्षी हनुमान जयंतीदरम्यान दुचाकी रॅलीत सहभागी होण्यासाठी जातो असे ते म्हणाले.
राजा यांची ट्विट करून माहिती
टी राजा यांनी याविषयी एक ट्विट केले आहे. माझ्या गोशामहल विधानसभा मतदारसंघातील हनुमान जयंतीच्या रॅलीत सहभागी होण्यापूर्वी बीआरएस सरकारच्या निर्देशावरून तेलंगाणा पोलिसांकडून अटक. आता हिंदू तेलंगाणात रॅलीतही भाग घेऊ शकत नाही? मला अटक कार केली हे माहिती नाही असेही टी राजा यांनी म्हटले आहे.
केसीआर सरकारवर आरोप
टी राजा यांनी केसीआर सरकारच्या धोरणांवर टीका करताना आरोप केले होते की, तेलंगाणात 8 व्या निजामाचे सरकार आहे. 2 एप्रिलला हैदराबादमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान राजा यांनी दिलेले प्रक्षोभक भाषण बघता पोलिसांनी त्यांना खबरदारी म्हणून अटक केली आहे.
प्रक्षोभक भाषणाबद्दल राजांवर अनेक प्रकरणे
रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान प्रक्षोभक भाषणाप्रकरणी टी राजा यांच्यावर तेलंगाणा आणि शेजारील राज्यांत अनेक प्रकरणांची नोंद झाली आहे. 29 जानेवारी रोजी मुंबईतील एका रॅलीदरम्यान प्रक्षोभक भाषणाप्रकरणी त्यांच्याविरोधात प्रकरण नोंदवले गेले आहे. तर गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यातही मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.