आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा मुलगा केटीआर यांच्यावर तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय कुमार यांनी एक गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे पुत्र केटीआर हे ड्रग्ज घेतात.
वृतसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, संजय कुमार म्हणाले की, कार्यकारी अध्यक्ष केटीआर यांचे रक्त आणि केसांचे नमुने जर मला मिळाले तर मी केलेला आरोप सिद्ध करून दाखवेन. केटीआरने केलेल्या आरोपावर देखील संजय कुमार यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, हा ट्विटर टिल्लू मला म्हणतो की, मला तंबाखू खाण्याची सवय आहे. हे विधान पूर्णपणे खोटे आहे.
मुळात ही केटीआर हेच ड्रग्ज घेतात. हीच खरी घटना आहे. तो ड्रग्ज घेत नाही, हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना रक्त तपासणीसाठी देण्याची त्यांच्यात हिमंत आहे का? मी तंबाखू खात नाही. हे सिद्ध करण्यासाठी मी माझ्या रक्ताचा किंवा माझ्या शरीराच्या कोणत्याही भागाचा नमुना द्यायला तयार आहे. निर्मल जिल्ह्यातील ममदा मंडळात प्रजा संग्राम यात्रेला संबोधित करताना भाजप अध्यक्षांनी केटीआरवर आरोप केला आहे.
केसीआर जी-20 बैठकीला का आले नाहीत?
संजय कुमार यांनी जी-20 बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल सीएम केसीआर यांच्यावरही निशाणा साधला. क्षुल्लक राजकीय कारणाव्यतिरिक्त बैठकीपासून दूर राहण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री केसीआर यांना विचारला.
डॉ. आंबेडकरांची जयंती उत्सव आठवडाभर साजरा व्हावा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी संजय कुमार यांनी तेलंगणा सरकारने डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस एप्रिलमध्ये किमान आठवडाभर साजरा करावा, अशी मागणी केली. आंबेडकरांची जयंती आणि पुण्यतिथीला टीआरएस एक तासही समर्पित देवू शकत नाही. हे मोठे दुर्दैव आहे, असा आरोप देखील संजय कुमार यांनी केला आहे. आंबेडकरांच्या आदर्शांच्या खर्या भावनेने भाजप राज्य करत असताना मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आजकाल घरातून बाहेरही पडत नाहीत.
मोदी आल्यानंतरच देशातील गरिबांना न्याय मिळाला
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच देशातील गरीब आणि दीनदुबळ्या जनतेला न्याय मिळाला आहे, असे ते म्हणाले. दलित नेते रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदी बसू शकतात. संसदेत डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसवण्याचे श्रेय देखील मोदींना जाते. पीएम मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात 12 दलित खासदारांचा समावेश केला. अनेक अनुसूचित जातींना राज्यपाल आणि मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. मोदी सरकारमुळे दरवर्षी 1.20 लाख दलित समाजातील तरूणांना रोजगार मिळत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.