आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रातील मोदी सरकारला सर्वसामान्यांबरोबर आता नेतेमंडळी देखील वैतागल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा यशस्वी प्रयोग झाला. त्यानंतर आता इतर राज्यात देखील भाजप विरोधात अनेक छोटे-मोठे पक्ष एकत्र येताना पाहायला मिळत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री देखील भाजप विरोधात उतरले आहेत. तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख चंद्रेशेखर राव यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भारताचे संविधान आता पुन्हा लिहिण्याची आवश्यकता आहे. आपल्या क्रांतीकारी विचारांना तसेच आपल्या गरजांसाठी लढण्याची आता आवश्यकता आहे. देशात गुणात्मक बदल अपेक्षित आहेत. त्यासाठी आपण सर्व पक्षांची भेट घेणार असे चंद्रेशेखर राव म्हणाले.
भाजपवर केला हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी नेते नाहीत. भाजपला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकून द्यायला हवे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून, आता आम्ही शांत बसणार नाहीत. या देशाचे नेतृत्व आता बदलायला हवे आहे. भारताला असमूतदार नेते आणि भाजपपासून मुक्त करायला हवे. असे म्हणत चंद्रेशेखर राव यांनी मोदींवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेणार भेट
राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोद यशस्वी झाल्यानंतर, आता अनेक राज्यांनी भाजपमुक्तीचा नारा दिला आहे. त्यासाठी आपण देखील लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे चंद्रेशेखर राव यांनी म्हटले आहे. भाजपकडून केंद्रीय संस्थाचा गैरवापर होत असून, समाजात फूट पाडण्याचे, तनावाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे अच्छे दिन हे धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. असे देखील राव म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.