आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी तथा आमदार के कविता दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात दिल्ली मद्य धोरण प्रकरणात त्यांची चौकशी केली जाईल. ED कविता यांना अटक करू शकते. याची शंका असल्याने मुख्यमंत्री केसीआर यांनी आपला मुलगा KTR आणि टी हरीश राव यांना दिल्लीला पाठवले.
केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप कविता यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, जिथे निवडणुका होतात. तिथे मोदींच्या आधी ईडी पोहोचते. मी तपासात पूर्ण सहकार्य करेन, असे कविता यांनी सांगितले. यापूर्वी 12 डिसेंबर 2022 रोजी CBI च्या वतीने कविता यांची सुमारे 7 तास चौकशी केली होती.
हैदराबादमध्ये पोस्टरद्वारे भाजपवर निशाणा साधला
हैदराबादमध्ये भाजपला लक्ष्य करणारे एक पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये हिमंता बिस्वा सरमा, ज्योतिरादित्य सिंधिया, नारायण राणे आणि शुभेंदू अधिकारी यांच्यासह अनेक नेते पूर्वी इतर पक्षात असल्याचे दाखवण्यात आले आहे. छापेमारीनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता कोणतीही तपास यंत्रणा त्यांना त्रास देत नाही. सीबीआय आणि ईडीच्या छाप्यांनंतरही कविता बदलल्या नाही. पोस्टरमध्ये कवितांसाठी लिहिले आहे की, खरे रंग कधीही फिके पडत नाही. पोस्टरच्या सर्वात खाली 'बाय-बाय मोदी' असे देखील लिहले आहे.
लढा दिल्लीपर्यंत नेणार - केसीआर
शुक्रवारी संध्याकाळी पक्षाच्या बैठकीत केसीआर म्हणाले की, चौकशीनंतर ईडी कविता यांना अटक करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केसीआर यांना वाटते की, भाजप कविता यांना त्यांच्या पक्षाला धमकवण्यासाठी अटक करू शकते. परंतू आपण मागे हटणार नसून हा लढा दिल्लीपर्यंत नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कविता यांच्या जवळचा सहकारी ईडीच्या ताब्यात
दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगच्या तक्रारींची ईडी चौकशी करत आहे. मंगळवारी दिल्ली न्यायालयाने हैदराबादचे व्यापारी अरुण रामचंद्रन पिल्लई यांना 13 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. अरुण हे के कविता यांच्या जवळचे मानले जातात. पिल्लई यांनी दारू धोरणात बदल करण्यासाठी आम आदमी पक्षाला 100 कोटी रुपये पाठवल्याचा आरोप आहे.
न्यायालयाने आणखी एक मद्यविक्रेता अमनदीप ढाल याला 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीचा आरोप आहे की, के कविता 'दक्षिण कार्टेल'चा एक भाग आहे, ज्यांनी लाच देऊन दिल्लीचे मद्य धोरण बदलून पैसे कमवले. लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी दिल्लीच्या दारू धोरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.
त्यानंतर ही पॉलिसी मागे घेण्यात आली. ईडी आणि सीबीआय या दोघांनी आरोप केला आहे की 'दक्षिण कार्टेल' लॉबीकडून लाचखोरीमुळे मद्य धोरणातील बदलाच्या वेळेत अनियमितता झाली. दक्षिण कार्टेलमध्ये के कविवट, आंध्र प्रदेशातील YSRCP खासदार मगनुन्था श्रीनिवासलू रेड्डी यांचा समावेश आहे.
हे ही वाचा
तेलंगणा CM च्या मुलीचे उपोषण संपले : अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणण्याची मागणी
तेलंगणा CM केसीआर यांची मुलगी कविता यांचे दिल्लीतील जंतर-मंतरवरील एक दिवसाचे उपोषण संपले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत AAP, अकाली दल, PDP, TMC, JDU, NCP, CPI, RLD, NC आणि समाजवादी पक्षासह 17 पक्षाचे नेते उपस्थित होते. - येथे वाचा संपूर्ण बातमी
सिसोदिया 17 मार्चपर्यंत ED च्या ताब्यात:7 आरोपींची चौकशी करणार तपास यंत्रणा; CBI च्या जामीन अर्जावर 21 मार्चला सुनावणी
दिल्ली दारु घोटाळ्याप्रकरणी अटकेत असेलेल मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर 21 मार्चला सुनावणी होणार आहे. तर ईडीला सिसोदिया यांची 7 दिवसांची (17 मार्च) कोठडी दिली आहे. ईडीने सिसोदिया यांची 10 दिवसांची कोठडी मागितली होती. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.