आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील अबकारी धाेरणात ईडी चाैकशीच्या आदल्या दिवशी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या तथा बीआरएस नेत्या के. कविता दिल्लीत उपाेषणाला बसल्या. केंद्राने अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक लागू करावे, अशी त्यांची मागणी आहे. या मुद्द्यावर सर्व पक्षांनी केंद्र सरकारवर दबाव आणावा असे आवाहनही त्यांनी केले.
बीआरएस पक्षाच्या नेत्या एस. कविता यांनी काँग्रेस नेत्या साेनिया गांधी यांची स्तुतीही केली. त्याचबराेबर काँग्रेसने या मुद्द्यावर पाठिंबा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. त्या म्हणाल्या, हे पाऊल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. कारण केसीआर यांनी चार वर्षांपासून स्वत:ला काँग्रेसपासून दूर ठेवले आहे. पहिल्यांदाच केसीआर यांच्या एखाद्या निकटवर्तीयाने काँग्रेसशी संपर्क साधला आहे. केसीआर २०१९ पासून केंद्रातील माेदी सरकारला हटवण्यासाठी काँग्रेसमुक्त विराेधी नेत्यांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.