आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू:एका महिन्यातील दुसरी घटना, मुलामध्ये रेबीजची लक्षणे

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने 5 वर्षांच्या मुलाचा रेबीजने मृत्यू झाला. हे प्रकरण खम्मम जिल्ह्यातील आहे. येथे काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी बनोथ भरतवर हल्ला केला होता. रविवारी त्याची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरांकडे नेले असता मुलामध्ये रेबीजची लक्षणे असल्याचे दिसून आले. त्यानंतर सोमवारी रुग्णालयात नेत असताना भरतचा मृत्यू झाला. यापूर्वी 19 फेब्रुवारी रोजी हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता.

भरतमध्ये रेबीजची लक्षणे दिसून आली होती मीडिया रिपोर्ट्सनुसार, भरतची आई संध्या यांनी सांगितले की, माझा मुलगा घराजवळ खेळत होता. येथे भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यामुळे तो जखमी झाला. रविवारी भरतची प्रकृती खालावली. आम्ही त्याला खम्मम येथील खासगी रुग्णालयात नेले. येथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की मुलामध्ये रेबीजची लक्षणे आहेत, त्यांनी भरतला चांगल्या उपचारासाठी हैदराबादला नेण्याचा सल्ला दिला.

सोमवारी मी माझा पती रविंदरसोबत भरताला हैदराबादला सरकारी बसने घेऊन जात होतो, पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात आरोग्य विभागाचे अधिकारी भरतच्या वैद्यकीय अहवालाची तपासणी करत आहेत.

यापूर्वी 19 फेब्रुवारीला हैदराबादमध्ये एका 4 वर्षांच्या चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता, त्यात त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना एका कार सर्व्हिसिंग सेंटरमध्ये घडली होती. येथे मुलाचे वडील वॉचमन म्हणून काम करत होते.

दुसरीकडे, 10 आणि 12 मार्च रोजी दिल्लीच्या वसंत कुंज परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या भावांची नावे आनंद (७) आणि आदित्य (५) अशी आहेत. मुलांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या शरीराचे अनेक भाग जवळजवळ तुटले होते.

कुत्र्यांनी 4 वर्षांच्या मुलाचे पोट फाडले, VIDEO : रस्त्याने जात होता मुलगा, 4 कुत्र्यांनी अक्षरशः तोडले लचके; रुग्णालयात मृत्यू

हैदराबादेत मोकाट कुत्र्यांनी 4 वर्षीय मुलाचा पोट फाडून बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसून येत आहे की, रस्त्याने जाणाऱ्या एका मुलावर 3 कुत्रे घेरून हल्ला करतात. हा मुलगा त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो. पण अखेर कुत्रे त्याला चावा घेऊन गंभीर जखमी करतात. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...