आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेलंगणाच्या मंचेरियल जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील एका घराला शुक्रवारी मध्यरात्री आग लागून 2 मुलांसह 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पोलिस ही आग केव्हा व कशी लागली याचा तपास करत आहेत.
एकाच कुटुंबातील 6 ठार
यासंबंधीच्या वृत्तानुसार, शेजाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्री 12 ते 12.30 च्या सुमारास शिवय्या नामक व्यक्तीच्या घराला आगीने वेढल्याचे पाहिले. त्यांनी त्याची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पण पोलिस पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत घरमालक शिवय्या (50) त्यांची पत्नी पद्मा (45), पद्माच्या मोठ्या बहिणीची मुलगी मोनिका (23) व त्यांच्या 2 मुलींचा होरपळून मृत्यू झाला आहे.
पोलिस तपास सुरू
मंदमरी सर्कलचे पोलिस निरीक्षक प्रमोद कुमार यांनी सांगितले, शिवय्या व त्यांची पत्नी पद्मा तेलंगणाच्या मंदमरी मंडळातील व्यंकटपूर येथे रहात होते. त्यांच्या शेजाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्री साडे 12च्या सुमारास त्यांच्या घराला आग लागल्याचे पाहिले. त्यानंतर त्याची माहिती त्यांनी तत्काळ ग्रामस्थ व पोलिसांना दिली. या घटनेत 2 अल्पवयीन मुलींसह 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. सध्या आग लागण्याच्या कारणांचा तपास केला जात आहे. तूर्त ही घटना शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घरात आढळले सर्व मृतदेह
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी पोहोचली. पण तोपर्यंत संपूर्ण घर जळून भस्मसात झाले होते. पोलिसांनी घरात 6 जणांचे मृतदेह आढळल्याचे सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.