आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणात वडिलांसमोरच मुलगी किडनॅप:बळजबरी खेचून कारमध्ये बसवले, फरार आरोपींच्या शोधात पोलिस

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणामध्ये एका 18 वर्षीय मुलीचे तिच्या वडिलांसमोरच चार जणांनी अपहरण केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले- याआधीही ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती, कदाचित त्यानेच तिला नेले असावे.

काही लोक तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. हे प्रकरण सिरसिल्ला जिल्ह्यातील आहे. मुलगी आणि तिचे वडील मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना अपहरणाची घटना घडली. ही घटना कधी घडली हे पोलिसांनी सांगितलेले नाही.

वडील वाचवण्यासाठी धावले, पण गाडी निघून गेली

एका कारमध्ये चार जण आल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. दोन जण बाहेर पडले आणि एकाने मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवले. दुसरा मुलीच्या वडिलांना पकडतो. यानंतर दोन्ही आरोपी तेथून कारमध्ये बसून फरार झाले. मुलीचे वडील गाडीच्या मागे धावले, पण गाडी निघून गेली.

अल्पवयीन होती, तेव्हा प्रियकरासह पळून गेली होती - पोलीस

वेमुलवाडा डीएसपी नागेंद्र चेरी म्हणाले - अपहरणात चार आरोपींचा सहभाग आहे. काही दिवसांपूर्वी मुलगी अल्पवयीन असताना तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे तपासात समोर आले आहे. आता ती प्रौढ झाली आहे. अपहरणात तिच्या प्रियकराचा हात असावा. तोच तिला घेऊन गेला. आरोपींना पकडण्यासाठी 3 पथके तयार करण्यात आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...