आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Telangana Lawyer Couple Murder Case Update; Hyderabad High Court On Chandrashekar Rao Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्घृण खून:भररस्त्यात वकील दांपत्याची चाकू भोसकून हत्या, हायकोर्ट म्हणाले- ही घटना म्हणजे सरकारच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह

हैदराबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रस्त्यावरील कुणीच दांपत्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही

तेलंगाणामध्ये भररस्त्यात एका वकील दांपत्याची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे, ज्यात आरोपी त्या दांपत्याला कारमधून बाहेर काढून चाकूने हल्ला करत असल्याचे दिसत आहे.

याप्रकरणी तेलंगाणा हायकोर्टाने स्वतः नोटीस घेऊन सरकारच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, लवकरात लवकर आरोपींच्या अटकेचे निर्देश दिले आहेत. ही घटना घडत होती तेव्हा अनेक सरकारी बस आणि खासगी वाहने तेथून जात होती, पण कुणीच त्या दांपत्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही.

हैदराबादवरुन आपल्या घराकडे जात होते

पोलिसांनी सांगितले की, पेद्दापल्ली जिल्ह्यातील मंथनीचे रहिवासी गट्टू वामनराव आणि त्यांची पत्नी वेंकट नागमणी तेलंगाणा हायकोर्टात वकील होते. वकील दांपत्य आपल्या कारमधून बुधवारी हैदराबादवरुन मंथनीकडे जात होते. कार ड्रायव्हर चालवत होता. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रामगिरी मंडल गावाजवळ त्यांच्या कारला काही अज्ञातांनी अडवले आणि दांपत्याला बाहेर काढून चाकूचे वार सुरू केले. यादरम्यान, त्या दांपत्याने स्थानिकांना या हल्ल्यामागे कुंटा श्रीनिवास नावाचा व्यक्ती असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...