आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Telangana TRS MLA Fumes, Grabs Official's Collar : Anger Over Late Calling Of School Program |Marathi News

TRS आमदाराने पकडली सरकारी अधिकाऱ्याची कॉलर:शाळेच्या कार्यक्रमाला उशिरा बोलावल्याने संताप

गडवाल3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) आमदार कृष्ण मोहन रेड्डी यांनी मंगळवारी एका सरकारी अधिकाऱ्याला कॉलर धरून शिवीगाळ केली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना जोगुलंबा गडवाल जिल्ह्यातील गडवालची आहे. एका कार्यक्रमासाठी उशिरा बोलावल्याने आमदार संतापले होते. गडवाल येथे एका शाळेचे उद्घाटन होणार होते, मात्र ते येण्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी शाळेचे उद्घाटन केले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
गडवाल येथील शाळेचे उद्घाटन केल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता यांच्यावर आमदार नाराजी व्यक्त करत होते. तेव्हाच सरकारी गुरुकुल शाळांच्या विभागीय समन्वयकाने मागून काहीतरी म्हटले. त्यावर आमदार संतापले आणि त्यांनी त्यांची कॉलर धरून धक्का दिला.

आमदाराने माफी मागावी : भाजप
संतप्त झालेल्या आमदाराला उपस्थित लोकांनी शांत केले. याप्रकरणी एसपी रंजन रतन कुमार म्हणाले की, आमच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास कारवाई करू. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आमदाराने माफी मागावी अशी मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...