आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तेलंगाणामधील वारंगलच्या सीमावर्ती भागातील एक विहीर सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे. एखाद्या सस्पेंस थ्रिलर चित्रपटाप्रमाणे या विहिरीतून मृतदेह निघत आहेत. या परिसराला गोरेकुंटा म्हटले जाते. येथील गोदामाजवळ एक विहीर आहे. गुरुवारी या विहिरीतून 4 मृतदेह आढळले होते, आज(दि.22)आणकी 5 मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले. इतक्या मोठ्या प्रमाणावर मृतदेह आढळल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे. सध्या पोलिस विभाग या प्रकरणाचा तपास घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व मृतदेहांच्या शरीरावर एकाही जखमेचे निशान आढळून आले नाही. त्यामुळे या सर्वांचा मृत्यू कसा झाला, याचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाचे चर्च फिरवले आहे. या विहिरीतून आणखी मृतदेह मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या सर्वांचा खून झाला की आत्महत्या ?
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, या 9 मृतदेहांपैकी 6 जण एकाच कुटुंबातील आहेत. हे सर्व पश्चिम बंगालचे प्रवासी मजुर असल्याचे सांगण्यात येत आहे. यात मकसूद (50) पत्नी निशा (45र्ष)मुलगी बसरा (20 ) आणि बसराचा तीन वर्षीय मुलगा सामील आहे.
तसेच, आज विहिरीतून निघालेल्या मृतदेहांमध्ये शादाब (22), सोहैल (20), बिहारचा रहिवासी श्याम (22), श्रीराम (20 ) आणि वारंगलचा शकील आहे. या मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
पोलिसांच्या इमरजेंसी रेस्क्यू टीमने या सर्व मृतदेहांना पाण्यातून बाहेर काढले. पोलिसांनी याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.