आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मरा:दूरसंचार कंपन्यांच्या महसुलात  तिमाहीत 2.64 टक्क्यांनी घट, परवाना शुल्कातून 4,541 कोटी रुपयांचे उत्पन्न

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दूरसंचार नियामक ट्रायने प्रकाशित केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२१ च्या तिमाहीत दूरसंचार सेवा कंपन्यांचा एकूण महसूल टक्क्यांनी घसरून ६९,६९५ कोटी रुपयांवर आला आहे.

परवाना शुल्कात १९२१ टक्क्यांनी वाढ होऊन ते ४,५४१ कोटी रुपयांवर गेले आहे, जे एका ३,८०९ कोटी रुपये होते. डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत सरकारचे स्पेक्ट्रम वापर शुल्क (एसयुसी) संकलन १४.४७ टक्क्यांनी वाढून १,७६० कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत १,५३८ कोटी रुपये होते.

रिलायन्स जिआेने डिसेंबर २०२२ अखेर संपलेल्या तिमाहीमध्ये १९,०६३.७५ काेटी रुपयांच्या सर्वाधिक एजीआरची नोंद केली आहे. त्या पाठाेपाठ भारती एअरटेल ४,४८४,४८ काेटी रुपये, व्होडाफोन आयडिया ६,५४१.८३ काेटी रुपये, बीएसएनएल १,९८४.९४ काेटी रुपये, टाटा टेलिसर्व्हिसेस ५३०.२१ काेटी रुपये, एमटीएनएल २५४.७८ काेटी रुपये, रिलायन्स कम्युनिकेशन्स ६१.६९ काेटी रुपये आणि क्वाड्रंटने १३.२२ काेटी रुपयांच्या एजीआरची नोंद केली आहे. अहवालानुसार, डिसेंबर २०२१ च्या तिमाहीअखेर देशातील एकूण इंटरनेट ग्राहकांची संख्या ८२.९३ कोटी आणि ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या ७९.२ कोटी होती.वायरलेस सेवेसाठी प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (एआरपीयू) ५.५५ टक्क्यांनी वाढून डिसेंबर २०२१ मध्ये ११४.१६ रुपये झाला. सप्टेंबर २०२१ मध्ये ताे १०८.१६ रुप रुपये होता. वार्षिक आधारावर त्यात १२.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टेलिफोन ग्राहकांची संख्या घटली
मागील तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर २०२१ अखेर भारतात टेलिफोन ग्राहकांची एकूण संख्या ०.९ टक्क्यांनी घटून ११७.८४ कोटी झाली आहे. एकूण ग्राहकसंख्येमध्ये ११५.४६ कोटी वायरलेस आणि २.३७ कोटी वायरलाइन ग्राहकांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...