आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Telecommunications, Health Care, Pharma And BFSI Pre Covid Par News And Live Updates

रोजगार:ऑगस्टमध्ये 89% वाढल्या नोकऱ्या, कोरोनापूर्वपेक्षा 24% जास्त; आयटीपासून रिअल इस्टेट, दूरसंचार, हेल्थ केअर, फार्मा व बीएफएसआय प्री-कोविड पार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसऱ्या लाटेनंतर वेगाने सामान्य होताहेत आर्थिक हालचाली

नोकऱ्यांच्या आघाडीवर एक चांगली बातमी आहे. देशात कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या भरतीत ऑगस्टमध्ये वार्षिक आधारावर ८९% ची वाढ पाहायला मिळाली आहे. ही कोरोनापूर्व ऑगस्ट २०१९ च्या तुलनेत २४% जास्त आहे. नाेकरी डॉट कॉमच्या नोकरी जॉबस्पीक इंडेक्समधून ही माहिती समोर आली आहे. ऑगस्टमध्ये नोकरी जॉबस्पीक इंडेक्स २६७३ नोंदली आहे. आयटी क्षेत्राच्या नेतृत्वात अनेक क्षेत्रांत कोरोनापूर्व स्थितीच्या तुलनेत नोकऱ्यांत वेगवान वाढ पाहायला मिळाली. आयटी क्षेत्रात ऑगस्टदरम्यान भरतीत ऑगस्ट २०१९ च्या तुलनेत ७९% वाढ नोंदली. शिक्षण/ टीचिंग क्षेत्रातील भरतीबाबत बोलायचे झाल्यास वार्षिक आधारावर १०२% ची बळकट वाढ राहिली. दुसरीकडे, ऑगस्ट २०१९ च्या तुलनेत ही ३४% जास्त राहिली.

अन्य क्षेत्रे ज्यात कोरोनापूर्व स्थितीच्या तुलनेत जास्त भरती झाली, त्यात स्थावर मालमत्ता(१५%), दूरसंचार (१३%), वैद्यकीय/ आरोग्य निगा (८%), फार्मा/बायोटेक(७%), विमा(६%) आणि बीएफएसआय(५%)चा समावेश आहे. वाहतूक व आदरातिथ्य क्षेत्रात गेल्या महिन्यातील भरतीत ऑगस्ट २०१९ च्या तुलनेत ५३% घट आली. मात्र, ऑगस्ट २०२० मध्ये जेव्हा देशात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले नव्हते तेव्हा त्याच्या तुलनेत या वर्षी ऑगस्टमध्ये भरतीत १३४% ची तेजी दिसली.

दुसऱ्या श्रेणींच्या शहरांच्या तुलनेत मेट्रो शहर पुढे
गेल्या ऑगस्टमध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे देशातील आर्थिक हालचाली पूर्ण ठप्प होत्या. यामुळे महानगरांत कंपन्यांच्या भरतीवर वाईट परिणाम झाला होता. मात्र, या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आर्थिक हालचाली वेगाने सामान्य होण्यास सुरुवात झाली. महानगरांत दुसऱ्या श्रेणीतील शहरांच्या तुलनेत भरतीत दुप्पट वाढ दिसली.

दुसऱ्या लाटेनंतर वेगाने सामान्य होताहेत आर्थिक हालचाली
जानेवारी- मे २०२१ ची तुलना २०१९ च्या समान अवधीशी केल्यास सुरुवातीच्या पाच महिन्यांत भरतीत घसरणीचा कल होता. जूनमध्ये सकारात्मक वृद्धी येण्यास सुरुवात झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आर्थिक हालचाली सामान्य पातळीकडे परतत आहेत. ऑगस्टचे आकडे पाहिल्यास आम्ही असे म्हणू शकतो की, देशाच्या जॉब मार्केटमध्ये वेगाने सुधारणा होत आहे.-पवन गोयल, चीफ बिझनेस ऑफिसर, नोकरी डॉट कॉम

बातम्या आणखी आहेत...