आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हैदराबाद:तेलुगू अभिनेत्री विजया शांतीचा भाजपत प्रवेश; अमित शहांची घेतली होती भेट

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेली तेलुगू अभिनेत्री विजया शांतीने सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. हैदराबाद मनपा निवडणुकीतील यशानंतर विजया शांतीने भाजपची वाट धरल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून २०२३ मधील तेलंगण विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

यंदाच्या निवडणुकीत टीआरएसनंतर भाजप दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. विजया शांतीने एक दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. यामुळे तिच्या भाजप प्रवेशाची शक्यता वर्तवली जात होती. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर विजया शांतीने काँग्रेसला रामराम ठोकला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser