आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Temple Can Be Demolished To Build A Mosque', Controversial Statement By All India Imam Association President

वादग्रस्त विधान:'मशीद बांधण्यासाठी मंदिर पाडले जाऊ शकते', ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या अध्यक्षाचे वादग्रस्त विधान

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले. राम मंदिर येत्या तीन ते चार वर्षात बांधून पूर्ण होईल, असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यादरम्यान, ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या अध्यक्षांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

'मशीद कायम मशीदच असते. मशीद पाडून त्या जागी काहीही दुसरे बांधता येत नाही. आम्हाला खात्री आहे की तिथे मशीद होती आणि कायम राहिल. मंदिर पाडून त्याजागी मशीद बांधण्यात आली नव्हती. पण आता कदाचित मशीद बांधण्यासाठी मंदिर पाडले जाऊ शकते', अशी दर्पोक्ती ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजीद रशीदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केली आहे. यासोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याला हजेरी लावून संविधानाचा अपमान केला असल्याचेही मत मौलानांनी मांडले.

साजीद रशीदी यांची वादद्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकवेळा त्यांनी वृत्त वाहिन्यांच्या चर्चांमध्ये वादग्रस्त केले आहेत. ते वादग्रस्त धर्मगुरू म्हणून प्रसिद्ध आहेत. वृत्त वाहिन्यांसोबतच सेलीब्रीटींवर केलेल्या टीकांमुळेही ते प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी यापूर्वी क्रिकेटर इरफान खानच्या सोशल मीडिया पोस्टवर गैर इस्लामी म्हणून टीका केल्या आहेत.

भूमिपूजनावर औवेसी यांचीही नाराजी

एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही राम मंदिराच्या भूमिपूजनावर नाराजी व्यक्त केली आहे. भूमिपूजनात सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पदाचा अपमान केला असल्याची टीका त्यांनी केली होती. तसेच, 'बाबरी मशीत होती, आहे आणि राहणार, असे ट्वीट त्यांनी केले.'

बातम्या आणखी आहेत...