आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Temple In Srinagar Closed Due To Militancy Reopened After 31 Years On Basant Panchami

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरात बदलते वारे:श्रीनगरमध्ये दहशतवादामुळे बंद झालेले मंदिर 31 वर्षानंतर उघडले; वसंत पंचमीदिवशी झाली पुजा

श्रीनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1987 पासून घाटीत दहशतवाद पसरला

श्रीनगरच्या हब्बा कदल परिसरात शीतलनाथ मंदिर आहे. एका अंदाजानुसार, घाटीत दहशतवादामुळे 50 हजार मंदिरे बंद झाली होती. 2019 मध्ये केंद्र सरकारने या मंदिरांना पुन्हा उघडण्याची घोषणा केली होती.

श्रीनगरमधील एका मंदिराची दारे 31 वर्षानंतर उघडली आहेत. येथे मंगळवारी पुन्हा मंत्रोच्चार ऐकू आला. घाटीत दहशतवादाची सुरुवात आणि हिंदूविरोधी वातावरण तयार झाल्यानंतर हे मंदिर बंद करण्यात आले होते. हब्बा कदल परिसरातील या शीतलनाथ मंदिरात भाविकांनी वसंत पंचमीदिवशी विशेष पुजा केली.

मंदिरातील संतोष राजदान यांनी सांगितले की, मंदिराला परत उघडण्यासाठी स्थानिकांनी आणि विशेषतः मुस्लिम समाजाने खूप मदत केली. येथे यापूर्वी लोक पुजेसाठी यायचे, पण दहशतवादामुळे हे मंदिर बंद केले होते. या परिसरात राहणारे अनेक हिंदू येथून निघून गेले होते, त्यामुळे मंदिर उघडण्यास खूप अडचणी येत होत्या. पण, यात मुस्लिम समाजातील अनेकांनी मदत केल्यामुळे मंदिर उघडणे सोपे झाले.

दहशतवादी घटना कमी झाल्या

5 ऑगस्ट 2019 मध्ये कलम-370 रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटना आणि दगडफेकीच्या घटना खूप कमी झाल्या आहेत. 8 फेब्रुवारीला केंद्रीय गृह राज्य मंत्री जी किशन रेड्डी यांनी राज्यसभेत सांगितले होते की, 2019 मध्ये 157 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 2020 मध्ये ही संख्या 221 वर पोहचली. 2019 मध्ये 594 दहशतवादीची प्रकरणे होती, 2020 मध्ये कमी होऊन 244 झाली. 2020 मध्ये दगडफेकीच्या फक्त 327 घटना घडल्या. 2019 मध्ये 2009 घडल्या होत्या.

1987 पासून घाटीत दहशतवाद पसरला

काश्मीरमध्ये 1987 मध्ये झालेल्या एका वादग्रस्त निवडणुकीनंतर दहशतवादी घटना वाढल्या. या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा पाठिंबा मिळाला. यामुळे घाटीत हिंदूविरोधी वातावरण तयार झाले आणि काश्मीरी पंडितांना पळून जावे लागले. एका अंदाजामुसार, घाटीतील 50 हजार मंदिरे बंद होती, ती 2019 नंतर सुरू करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...