आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशातील खाजपूर गावातील २० वर्षीय आकाशसिंहने दोन वर्षांत शेकडो कैद्यांचे जीवनच बदलून टाकले आहे. दरमहिन्याला मंदिर आणि मजारीहून सुमारे ८ हजार किलो राख व नारळाचा कचरा ते जमा करतात. यातून मूर्ती व हस्तकलेच्या वस्तू तयार करतात. या मूर्ती कैदी तयार करतात. बीटेक शिकत असतानाच आकाशच्या डोक्यात ही कल्पना आली होती. ते सांगतात, “मी लहान होतो तेव्हा मित्रांसोबत तलावाकाठी बसत होतो. तेथे मंदिरातील पुजारी तलावात राख टाकत.’
आकाश यांनी अगोदर राखेला काँक्रीटमध्ये बदलले. नंतर नारळाच्या कचऱ्यापासून राख तयार करून काँक्रीटमध्ये मिसळण्याचा प्रयोग केला. यातूनच २०१८ मध्ये त्यांनी एनर्जिनी इनोव्हेशन्स ही कंपनी स्थापन केली. १ हजार रुपयांचा कच्चा माल खरेदी केला. मूर्ती तयार केल्या. या मूर्ती पाहता पाहता विकल्या गेल्या. कासना तुरुंगाच्या अधीक्षकांशी त्यांनी चर्चा केली आणि या कलेत त्यांनी कैद्यांचीही मदत घेतली. दिल्ली-एनसीआरच्या १६० मंदिरातून आणि दर्ग्यांतून राख जमा केली जात होती. या राखेतून तयार केलेल्या वस्तू कॉर्पोरेट घराणी, ऑनलाइन तसेच गिफ्ट शॉपीमध्ये विकल्या जात होत्या. आज दोन वर्षांत कंपनीची उलाढाल कोट्यवधीत आहे. यातून नद्या शुद्ध होऊ लागल्या आणि कैद्यांचे जीवनही सुधारू लागले. आकाश सांगतात, “संजय अपहरण व बलात्काराच्या आरोपावरून एक वर्षापूर्वीपर्यंत तुरुंगात होता. बालमैत्रिणीसोबत त्याचे प्रेम जडले. मंदिरात विवाहही केला. पण मुलगी अल्पवयीन होती. तिच्या वडिलांनी अपहरण व बलात्काराची तक्रार दिली. संजयने आकाशसाठी काम करणे सुरू केले तेव्हा यावर एक माहितीपट तयार झाला. तो पाहून त्या मुलीच्या वडिलांना सत्य कळाले. ते स्वत: संजयच्या घरी विवाहाचा प्रस्ताव घेऊन गेले आणि तक्रार मागे घेतली.’ संजय आता आकाशच्या कंपनीतच काम करतो.
१४ देशांत आकाशवर लघुपट, भारतात लवकरच
आकाशची ही कहाणी एका लघुपटातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर १४ देशांत प्रदर्शित झाली आहे. लवकरच भारतात ती प्रदर्शित होईल. आता तो एमएसएमई मंत्रालय आणि नीती आयोगासोबत अनेक प्रकल्पांवर काम करत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.