आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायकोर्टाचा निकाल:तिस्ता सेटलवाड यांना तात्पुरता जामीन मंजूर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना तात्पुरता जामीन मंजूर केला. सर न्यायाधीश यू. यू. लळीत, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या पीठाने गुजरात सरकार आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पीठाने म्हटले,‘तिस्ता सेटलवाड यांना तात्पुरत्या जामिनाचा हक्क आहे. त्या चौकशीत पूर्ण सहकार्य करतील. जामीन अर्जावर हायकोर्टात निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना पासपोर्ट कनिष्ठ न्यायालयात जमा करावा लागेल. पोलिसांनी एफआयआरमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालाव्यतिरिक्त काहीही नमूद केलेले नाही. जामीन दिला जाऊ नये असा कुठलाही आरोप तिस्ता यांच्यावर नाही.’

बातम्या आणखी आहेत...