आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ten Quintals Of Gold, 160 Quintals Of Silver In Temples In Himachal, The State Government Will Soon Mint And Sell

मंदिरांमध्ये अब्जावधींची संपत्ती:हिमाचलमधील मंदिरांत 10 क्विंटल सोने,160 क्विंटल चांदी; सरकार लवकरच नाणी बनवून विकणार

सिमला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेशातील विविध मंदिरांमध्ये अब्जावधींची संपत्ती असून ही सर्व सरकारच्या अखत्यारीत आहे. राज्यातील ३३ प्रमुख मंदिरांमध्ये १० क्विंटल सोने आणि १६० क्विंटलपेक्षा अधिक चांदी आहे. त्यामुळे त्याची नाणी बनवून विकण्याचा निर्णय हिमाचल सरकारने घेतला आहे.

केंद्र सरकारच्या खनिज संपत्ती व्यापार महामंडळाशी (एमएमटीसी) परस्पर सहमती करार करावा लागणार आहे. पुढील पाच-सहा महिन्यांत नाणी उपलब्ध होतील, असे राज्य सरकारने सांगितले आहे. सरकारच्या मते, उना येथील चिंतपूर्णी मंदिरात सर्वाधिक १.९८ क्विंटल सोने आहे, तर सर्वाधिक ७२.९२ क्विंटल चांदी नैना देवी मंदिरात आहे.

मंदिरात असलेल्या ५० टक्के सोन्या-चांदीची नाणी बनवली जाणार आहेत. २० टक्के सोने-चांदी धार्मिक स्थळांच्या ट्रस्ट तसेच मंदिराच्या विकास कामांसाठी खर्च केला जाणार आहे. टक्के सोने-चांदी राखीव ठेवली जाणार आहे, असे भाषा आणि संस्कृती विभागाचे सचिव राकेश कंवर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...