आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Tender For Private Train Starts For The First Time, First Train To Run From 2022; 23 Companies In The Race To Run A Private Train, Out Of Which 10 Companies Have Zero Experience!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर रिसर्च:पहिल्यांदाच खासगी रेल्वेसाठी निविदा सुरू, पहिली ट्रेन 2022 पासून धावणार; खासगी ट्रेन चालवण्याच्या शर्यतीत 23 कंपन्या, पैकी 10 कंपन्या अनुभव शून्य!

शरद पांडेय । नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 13 कंपन्यांना आधीपासून रेल्वेसंबंधी अनुभव, पायाभूत, गुंतवणूक, फंड मॅनेजरमध्ये स्पर्धा

देशात एप्रिल २०२२ मध्ये पहिली खासगी रेल्वे धावणे अपेक्षित आहे. त्यासाठी लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या २३ कंपन्यांनी रस दाखवला आहे. मात्र, त्यापैकी १० कंपन्या नवीन आहेत. या कंपन्यांकडे रेल्वेशी संबंधित कामाचा काहीही अनुभव नाही. उर्वरित १३ कंपन्या आधीपासूनच रेल्वेशी संबंधित कामे करतात. खासगी ट्रेन चालवण्याची इच्छा असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक, फंड मॅनेजरपासून वीज क्षेत्र व खानपान सुविधा देणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे.

रेल्वे, इंजिन, काेचसंबंधी कंपन्यांचाही समावेश

आयआरसीटी : तिकीट बुकिंग, तेजस ट्रेनपर्यंत संचलन.

भारत फाेर्ज : रेल्वे इंजिन, पाणबुडी, हवाई उद्याेग क्षेत्रातील सुटे भाग, वीज, तेल, गॅस, संरक्षण.

टिटागड वॅगन : रेल्वे काेच, पूल.

गेट रेल्वे : कंटेनर ट्रेन कंपनी.

मेधा : वंदे भारतचेही काम केले

कॅप इंडिया प्रा. लि. काेच : वाहनांची डिझाइन व बांधणी

हिंद रेक्टिफायर्स : सुट्या भागांचा पुरवठा.

इन्फ्रा, स्टेशन विकास क्षेत्रातील कंपन्या

एल अँड टी : फ्रेट काॅरिडाॅर बनताेय.

जीएमआर : विमानतळ, स्थानक

मेधा : इन्फ्रा, जलविद्युत प्रकल्प.

अवजड उद्योग
आय बाेर्ड इंडिया : इलेक्ट्रिकल यंत्रे, उपकरणाचे निर्माता. पीएसजीजी : तंत्रज्ञान यंत्र. बीईएमएल : वाहन, सुटे भाग.

बीएचइएल : वीज उपकरणे.

वीज क्षेत्र

स्टर्लाइट : इंटिग्रेटेड पाॅवर.

इन्फ्रा अँड इन्व्हेस्टमेंट नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रा फंड, आयएसक्यू एशिया इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट लिमिटेड.

निर्मितीत महत्त्वाची यंत्रे व अवजड वाहने

जॅसन इन्फ्रा : रस्ते, महामार्ग, पूल, खाणी, सिंचनशी संबंधित पायाभूत क्षेत्रातील काम.

सीमेन्स लिमिटेड : उद्याेग निर्मिती, उत्पादन कंपनी.

खासगी रेल्वेचे भाडे, मार्ग, दंड, सुविधा व सरकारी रेल्वेपेक्षा ही गाडी कशी वेगळी असेल? चला, हे सर्व जाणून घेऊया...

> खासगी रेल्वे कधी सुरू हाेणार?

पहिली खासगी रेल्वे एप्रिल २०२२ पासून सुरू हाेणे अपेक्षित आहे. २०२५ पर्यंत ५०० रेल्वे चालवण्याची तयारी. पहिल्या टप्प्यात १५०, दुसऱ्या टप्प्यात ३५० रेल्वे सुरू हाेतील.

> काेणत्या मार्गावर धावतील?

१०९ मार्गांवर १५० रेल्वे धावतील. मुंबई, दिल्ली, पाटणा, चंदीगड, हावडा, पाटणा, प्रयागराज, सिकंदराबाद, जयपूर, चेन्नई, बंगळुरूमध्ये १२ केंद्रे सुरू करण्यात आले आहेत.

> खासगी रेल्वेचे भाडे किती असेल?

खासगी रेल्वेचे भाडे त्याला चालवणारी कंपनी निश्चित करेल. त्यात सरकार किंवा रेल्वे विभाग हस्तक्षेप करणार नाही.

> रेल्वेची काय भूमिका असेल?

खासगी रेल्वेत सरकारी गार्ड व लाेकाे पायलट असतील. ते सरकारला ५१२ रुपये प्रति किमी चार्ज देतील.

> काय-काय सुविधा असतील?
खासगी रेल्वेत दिल्या जाणाऱ्या सुविधा चालवणाऱ्या कंपनी किंवा आॅपरेटरवर अवलंबून असेल.

> विलंब झाल्यास काय?

रेल्वे चालवणाऱ्या कंपन्यांना ९५ टक्के वेळा पाळण्याची हमी द्यावी लागेल. एक टक्के विलंब झाल्यास प्रति किमी ५१२ रुपयांनुसार २०० किमींचा दंड भरावा लागेल.

> खासगी व सरकारी रेल्वे साेबत चालवल्या जातील?
हाेय. प्रवाशांकडे निवडीचे दाेन्ही पर्याय असतील. दाेन्ही ट्रेनमध्ये तासाभराचे अंतर असेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser