आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tennis Star Sharapova And Formula One Racer Schumacher Booked In Gurugram; Delhi Couple Had Booked Apartment

शारापोव्हा आणि शूमाकरविरोधात एफआयआर:गुरुग्राम न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल, दिल्लीतील महिलेची 80 लाखांची फसवणूक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुग्राम पोलिसांनी रशियन टेनिस स्टार मारिया शारापोव्हा आणि प्रसिद्ध फॉर्म्युला वन रेसर मायकल शूमाकर यांच्याविरुद्ध बादशाहपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियलटेक डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपर्स या केसमध्ये मुख्य पक्षकार आहेत. या प्रकरणात दिल्लीतील एका महिलेकडून निवासी अपार्टमेंट बुक करून सुमारे 80 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

नवी दिल्लीच्या छतरपूर भागातील मिनी फार्म नंबर-10 मधील शेफाली अग्रवाल यांनी गुरुग्राम कोर्टातील JMFC हर्ष कुमार यांच्या कोर्टात दावा दाखल केला. गुरुग्रामच्या सेक्टर-73 भागात एक प्रकल्प सुरू होत असल्याचे त्यांना 2013 मध्ये त्यांना जाहिरातींद्वारे कळाले होते. शफाली अग्रवाल यांनी या प्रकल्पात शारापोवा टॉवर नावाने 3650 चौरस मीटरचे निवासी अपार्टमेंट बुक आहे. प्रकल्पातील एका टॉवरला शूमाकरचे नाव देण्यात आले. हा प्रकल्प 6 वर्षात म्हणजे 2019 पर्यंत पूर्ण करायचा होता.

16 मार्च 2013 ला 35 लाख, 7 ऑगस्ट 2013 रोजी 28 लाख, 10 ऑगस्ट 2013 रोजी 12 लाख आणि त्यानंतर 15 डिसेंबर 2013 रोजी आणखी 4 लाख 1 हजार 848 रुपयांचा धनादेश शेफाली यांनी दिला. म्हणजेच एकूण 79 लाख 1 हजार 848 रुपयांची रक्कम त्यांनी जमा केली. पण, बराच वेळ होऊनही प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने त्यांनी 6 जानेवारी 2015 रोजी रियलटेक डेव्हलपमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि डेव्हलपर्संना पत्र लिहून पैसे परत मागितले. यानंतर 16 फेब्रुवारी 2016 पर्यंत सलग 10 इमेल व विविध माध्यमातून पाठविण्यात आली, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, ज्या कंपनीच्या नावावर हा प्रकल्प सुरू असल्याची चर्चा होती. त्या कंपनीने या भागात कोणतीही जमीन संपादित केलेली नाही, असे त्यांच्या समोर आले. यानंतर शेफाली यांनी प्रकल्पाचे प्रमोटर म्हणून शारापोव्हा आणि शूमाकर यांच्यावर कट रचल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रारही केली. गुरुग्राम न्यायालयाच्या आदेशानुसार बादशाहपूर पोलीस ठाण्यात कलम 420, 406, 120बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेनिस स्टारकडून घटनास्थळाचा दौरा?

शेफालीने न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यानुसार, त्यांना या प्रकल्पाची जाहिरातीतून माहिती मिळाली होती. प्रकल्पाचे फोटो पाहिल्यानंतर आणि अनेक आश्वासनानंतर कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधून गुंतवणूक केली होती. या प्रकल्पाचे प्रमोटर म्हणून शारापोव्हा आणि शूमाकर यांनी कट रचला. माजी टेनिसस्टारने देखील या ठिकाणी भेट दिली होती. तसेच येथे टेनिस अकादमी आणि स्पोर्ट्स स्टोअर उघडण्याचे आश्वासन दिले होते. एवढेच नाही तर खरेदीदारांसोबत डिनर पार्टीदेखील केली होती, असा दावा शफाली यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...