आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tension In Shahjahanpur Mosque Due To Burning Of Scriptures, Latest News And Update

मुस्लिम युवकाने मशिदीत जाळला धर्मग्रंथ:शाहजहानपूरमध्ये अटकेनंतर म्हणाला - मी नव्हे माझ्या आत्म्याने जाळला धर्मग्रंथ

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाहजहानपुरात बुधवारी सायंकाळी मशिदीत शिरून धर्मग्रंथाचा अवमान करणाऱ्या एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात. ताज मोहम्मद मुन्ना असे त्याचे नाव आहे. तो मशिदीपासून 3 किमी अंतरावर असणाऱ्या बाजूजई मोहल्ल्यात राहतो.

त्याने चौकशीत आपण कोणताही कामधंदा करत नसल्याचे सांगितले. तो म्हणाला - मी कोणतेही काम करत नाही. केवळ इकडे-तिकडे फिरतो. कुटुंब माझे लग्न लावून देत नाही. यामुळे मी बैचेन झालो आहे. यावेळी त्याला धर्मग्रंथ का जाळला, असे विचारले असता त्याने तो मी नव्हे तर माझ्या आत्म्याने जाळल्याचे स्पष्ट केले.

धर्मग्रंथाचा अवमान झाल्याचे वृत्त पसरताच बुधवारी सायंकाळी मशिद परिसरात मोठा जमाव जमला हतोा. संतप्त लोकांनी तत्काळ अटकेची मागणी करत भाजपच्या पोर्टर्सची जाळपोळ केली होती. तसेच पोलिसांविरोधातही घोषणाबाजी केली होती. स्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार केला. तसेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात केले.

या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेजही उजेडात आले आहे. त्यात एक संशयित दिसून येत आहे. त्या आधारावर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तत्पूर्वी गुरुवारी सकाळी दंडाधिकाऱ्यांनी या भागाचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

घटनेची माहिती मिळताच शेकडो जणानी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच शेकडो जणानी घटनास्थळी धाव घेतली.

प्रकरणातील वादी हाफिज हसीब यांनी सांगितले की, "घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतरही सकाळी नमाज पठण करण्यात आला. पण ज्या संख्येने लोक येतात, तेवढे आले नाही. शाहजहानपूरमधील अशी ही पहिलीच घटना आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करावी.

संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

भाजपच्या होर्डिंग्जची जाळपोळ

शाहजहानपूरच्या मोहल्ला बावूजईमद्ये सय्यद शाह फखरे आलम मियां मशिद आहे. बुधवारी सायंकाळी 2 तरुणांनी या मशिदीत शिरून धर्मग्रंथ जाळला होता. मगरिबच्या नमाजासाठी हाफिज नदीम व इतर जण पोहोचले तेव्हा त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यानंतर त्याची माहिती त्यांनी इमामाला दिली.

रात्री 8 च्या सुमारास मशिदीच्या परिसरात मोठा जमाव जमला. त्यानंतर काही तरुणांनी तिथे लावण्यात आलेले भाजपचे होर्डिंग्ज फाडून पेटवून दिले.
रात्री 8 च्या सुमारास मशिदीच्या परिसरात मोठा जमाव जमला. त्यानंतर काही तरुणांनी तिथे लावण्यात आलेले भाजपचे होर्डिंग्ज फाडून पेटवून दिले.
जमावाने भाजपच्या होर्डिंग्ज फाडून पेटवून दिले.
जमावाने भाजपच्या होर्डिंग्ज फाडून पेटवून दिले.

अधिकाऱ्यांनी समजावल्यानंतरही जमाव संतप्त

जाळपोळीची माहिती मिळताच एसपी, एसपी सिटी, एसपी ग्रामीणसह मोठ्या संख्येने पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमावाला समजावून सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण जमाव शांत झाला नाही. त्यांनी भाजपचे पोस्टर्स जाळले. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. त्यानंतर तिथे चेंगराचेंगरीची स्थिती उद्भवली. पण रात्री 9 च्या सुमारास पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली. तूर्त पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपींना अटक करण्याची ग्वाही दिली आहे.

तणावाची स्थिती पाहता पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
तणावाची स्थिती पाहता पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी

एसपी एस आनंद यांनी सांगितले की, या प्रकरणी अज्ञात व्यकतीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. जमावलाही शांत करण्यात आले आहे. आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने लवकरच आरोपींना अटक केली जाईल.​​​​​

या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेज उजेडात आले आहे. त्यात एक संशयित दिसून येत आहे.
या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेज उजेडात आले आहे. त्यात एक संशयित दिसून येत आहे.

आसपासच्या भागातही बंदोबस्त

वाढता तणाव पाहता या भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही जणांना मशिदीतही तैनात करण्यात आले आहे. काही पोलिस मुख्य रस्त्यावर तर काही मोहल्ल्याच्या वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात आलेत. या प्रकरणी संशयितांची चौकशीही केली जात आहे.

घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला.
घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला.

एकाच गेटमधून मशिदीत ये-जा

डीएम उमेश प्रताप सिंह यांनी मशिदीचाही आढावा घेतला
डीएम उमेश प्रताप सिंह यांनी मशिदीचाही आढावा घेतला

मशिदीत येण्याजाण्यासाठी एकच रस्ता व गेट आहे. गेटमधून मशिदीत जवळपास 15 ते 20 पाऊले चालल्यानंतर नमाज पठण करण्यासाठी चादर अंथरण्यात आली आहे. नमाज पूर्ण झाल्यानंतर नमाजी मशिदीत बाजुला ठेवण्यात आलेल्या कुरानाचे पठण करतात. ते तुमच्या इच्छेवर अवलंबून असते. मशिदीच्या गेटपासून 25 ते 30 पावलांच्या अंतरावर कुरान जाळून टाकण्यात आलेले दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...