आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरोधकांचा वार:लडाख सीमेवर तणाव : राहुल यांचा शहांना शायरीतून टोला; म्हणाले-सीमेवरील स्थिती सगळ्यांनाच ठाऊक

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • व्हर्च्युअल रॅलीत शहांनी संरक्षण धोरणांविषयी केलेल्या दाव्यांवर काँग्रेसने उपस्थित केले सवाल

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लडाख सीमेवरील तणावावरून गृहमंत्री अमित शहा यांच्या एका शायरीतून निशाणा साधला आहे. मंगळवारी एका ट्विटद्वारे त्यांनी शायरी पोस्ट केली. ते म्हणाले, “सबको मालूम है सीमा की हकीकत, लेकिन दिलके खुश रहने को शाह-यद ये ख्याल अच्छा है.’ दरम्यान, रविवारी व्हर्च्युअल रॅलीमध्ये भारताच्या संरक्षणविषयक धोरणाला जागतिक मान्यता मिळाल्याचे अमित शहा यांनी म्हटले होते. अमेरिका व इस्रायलनंतर भारत आपल्या सीमेचे रक्षण करण्यास सक्षम आहे, असे जगाने मान्य केल्याचा दावा शहा यांनी केला होता. सीमेवरील तणावावरून गेल्या आठवड्यातही राहुल यांनी सरकारवर टीका केली होती.

झारखंड : सीमा प्रकल्पात ११,८२५ मजूर करणार काम

रांची/नवी दिल्ली|झारखंड सरकारने सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) महत्त्वाच्या प्रकल्पासाठी राज्यातील ११,८१५ मजुरांची भरती करण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, सरकार मजुरांच्या फायद्यासाठी कटिबद्ध आहे. आदिवासी बांधवांनी अनेक वर्षे देशाची सेवा केली आहे.

सीएमओ कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले, यापैकी सुमारे ८ हजार मजूर लडाखमध्ये ऑपरेशन विजय आणि उत्तराखंडात शिवालिक, हिमाचलमध्ये दीपक प्रकल्पात आणि जम्मू-काश्मिरात बीकन प्रकल्पात काम करतील.

प. बंगाल : शहांची व्हर्च्युअल रॅली; तृणमूलच्या अपयशावर करणार भाष्य

बिहारनंतर आता गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालसाठी मंग‌ळवारी व्हर्च्युुअल रॅलीला संबोधित करतील. पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. सूत्रांनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना घेरण्यासाठी भाजपने अजेेंडा तयार केला आहे. भाजपकडून तृृणमूलच्या ९ वर्षांच्या अपयशाला मुद्दा बनवले जाईल. राज्यात ८८ हजार बूथ आहेत. यातील किमान ६६ हजारांना व्हर्च्युअल रॅलीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल.

उत्तर प्रदेश : प्रियंका म्हणाल्या- यूपीत व्यापमंसारखा शिक्षक भरती घोटाळा

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी उत्तर प्रदेशातील ६९ हजार सहायक शिक्षकांच्या भरतीवरून सोमवारी राज्य सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, हा शिक्षक भरती घोटाळा यूपीचा व्यापमं घोटाळा आहे. या प्रकरणात डायरीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, पैशाची देवाणघेवाण, परीक्षा केंद्रांमध्ये हेराफेरी हे सर्व संशयास्पद आहे.

बातम्या आणखी आहेत...