आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहवाल:लडाखमधील चिनी सेनेशी तणाव चर्चेतून निवळला : भारतीय सेना

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिनी हेलिकॉप्टर दिसताच अलर्ट झाली भारतीय िवमाने

पूर्व लडाखच्या पँगोंग त्सो झीलच्या उत्तर बाजूला भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये निर्माण झालेला तणाव संपुष्टात आला आहे. ही माहिती भारतीय सेनेचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी मंगळवारी दिली. त्यांनी स्पष्ट केले की, पँगोंग त्साे येथे तणावाची स्थिती आणि आणि दोन्हीकडे सशस्त्र सैनिकही नाहीत. वादाचे मुद्दे चर्चेतून निकाली काढण्यात आले आहेत. सेनेचे हे स्पष्टीकरण अशा वेळी आले ज्या वेळी दावा करण्यात आला होता की, दोन्हीकडे १००-१०० सैनिक समोरासमोर उभे आहेत आणि डोकलामसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. या घटनेनंतर नियंत्रण रेषेवर चिनी हेलिकॉप्टर घिरट्या घालत होते आणि त्यांना भारतीय वायुसेनेच्या सुखोई-३० विमानांनी पळवून लावले, असाही दावा केला जात होता. परंतु, ही नियमित प्रक्रिया आहे, असे सेनेच्या वतीने सांगण्यात आले. लडाखच्या घटनेवेळी चीनचे हेलिकॉप्टर त्यांच्यासीमेत उडत होते. त्याच वेळी आपल्या सीमेतून भारतीय हेलिकॉप्टर्सनीही भरारी घेतली होती.

गत सप्ताहात दोन्ही बाजूंनी झाली होती दगडफेक; १० सैनिक झाले होते जखमी

सूत्रांनी सांगितले की, १५ हजार फूट उंचीवर दोन्ही बाजूंमधील लडाखच्या वादग्रस्त तलावाच्या उत्तर किनाऱ्यावर ५ मेच्या रात्री चीनच्या जवानांनी एका भारतीय गस्ती पथकाच्या उपस्थितीला हरकत घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. वाद वाढताच चिनी सैनिकांनी दगडफेक केली. भारतीय सैनिकांनीही त्याला प्रत्युत्तर दिले.यात ४ भारतीय जवानांसह दोन्ही बाजूंचे १० जवान जखमी झाले. जखमींमध्ये कॅप्टन रँकच्या एका भारतीय अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या घटनेनंतर दोन्हीकडील जवानांत उत्तर सिक्कीच्या नाकू ला दर्रा येथे शनिवारीही धक्काबुक्की झाली होती, असे सूत्रांनी सांगितले.

तज्ज्ञ म्हणतात : गस्त हाच एकमेव मार्ग, नाकू लाची घटना आकलनापलीकडची, परिसर निर्जन

सैन्याच्या संचालन महानिदेशक पदावरून निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया म्हणाले की, भारताने येथील पायाभूत सुविधा अलीकडेच खूप मजबूत केल्या आहेत आणि उत्तर किनाऱ्यावर आपण फिंगर-५ पर्यंत गस्त घालत आहोत. यामुळे चीनकडूने अतिक्रमणाचा प्रयत्न झाल्यास लगेच उघट होते. या परिसरात त्यांची चौकी नाही आणि आपला अधिकार दाखवण्यासाठी गस्स हाच एकमेव मार्ग आहे. परंतु, सिक्कीमच्या निर्जन नाकू लाची घटना आकलनापलीकडची आहे.

सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा परिसर म्हणून तणावाचे गांभीर्य

पँगोंग त्सो हे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्यामुळे हा तणाव डोकलामपेक्षाही गंभीर मानला जात आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ही स्थिती फेब्रुवारीपासून निर्माण होत आहे. तेव्हा तलावाच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर-२ परिसरात भारतीय सैनिकांच्या गस्तीवर चिनी सैनिकांनी आक्षेप घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...