आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Terror Funding Case| NIA Raids In 45 Places In Jammu And Kashmir |Jamaat E Islami Members Being Searched

टेरर फंडिंग प्रकरणात छापेमारी:जम्मू-कश्मीरच्या 14 जिल्ह्यांमध्ये 45 ठिकाणांवर NIA चा छापा, फूटीरतावादी संघटना जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांच्या घराची झडती

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चार कथित दहशतवाद्यांवर पाकिस्तानकडून फंड घेतल्याचा आरोप

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) टेरर फंडिंगच्या प्रकरणात आज जम्मू-कश्मीरच्या 14 जिल्ह्यांमध्ये सुमारे 45 ठिकाणी छापेमारी करत आहे. या जिल्ह्यांमध्ये श्रीनगर, पुलवामा, कुपवाडा, डोडा, किश्तवाड, रामबन, अनंतनाग, बडगाम, राजौरी आणि शोपियान यांचाही समावेश आहे.

जम्मू-काश्मीर पोलिस आणि CRPF सोबत मिळून NIA चे अधिकारी जमात-ए-इस्लामी सदस्यांच्या घरांची झडती घेत आहेत. या संघटनेच्या पाकिस्तान समर्थक आणि फूटीरतावादी धोरणांमुळे 2019 मध्ये केंद्र सरकारने त्यावर बंदी घातली होती. असे असूनही ही संघटना जम्मू -काश्मीरमध्ये कार्यरत होती.

10 जुलै रोजी एनआयएने जम्मू -काश्मीरमध्ये 6 लोकांना टेरर फंडिंग प्रकरणात अटक केली होती. याच्या एक दिवस आधी जम्मू -काश्मीर सरकारच्या 11 कर्मचाऱ्यांना दहशतवादी संबंध असल्याच्या कारणावरून नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. यामधील दोन आरोपी हे हिजबुल-मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनचे मुलं होते.

चार कथित दहशतवाद्यांवर पाकिस्तानकडून फंड घेतल्याचा आरोप
हिजबुल-मुजाहिद्दीनच्या चार कथित दहशतवाद्यांविरोधात पुरावे मिळाले की त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानकडून पैसे घेतले होते. या प्रकरणी दिल्लीच्या एका न्यायालयाने त्यांच्यावर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयाने या चार कथित दहशतवाद्यांवर गुन्हेगारी कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे आणि यूएपीए अंतर्गत अनेक चार्ज लावण्याचे आदेश दिले आहेत. हिजबुल-मुजाहिद्दीनने जम्मू-काश्मीर अफेक्टीव्ह रिलीफ ट्रस्ट (JKART) नावाची बनावट संघटना स्थापन केल्याचे न्यायालयाने म्हटले होते. त्याचा खरा उद्देश दहशतवादी कारवायांना निधी पुरवणे हा होता. या ट्रस्टकडून दहशतवादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना पैसे दिले जातात.

बातम्या आणखी आहेत...