आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Terror In The Valley, 80 Per Cent Kashmiri Pandits Leave The Village And Reach Jammu, The Scene Of Migration Reappears After 32 Years; Frightened Kashmiri Pandit

खोऱ्यात दहशत:80 टक्के काश्मिरी पंडित गाव सोडून पोहोचले जम्मूमध्ये, 32 वर्षांनंतर पुन्हा दिसले स्थलांतराचे दृश्य

जम्मू-काश्मीरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीर प्रशासनाने सुरक्षेचे आश्वासन देऊनही खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे स्थलांतर सुरू झाले आहे. उत्तर काश्मीरमधील संक्रमण शिबिरापासून ते शेखपोरा बडगामच्या हाय-प्रोफाइल निवासस्थानापर्यंत सर्वत्र शांतता आहे. प्रशासन स्थलांतराचे वृत्त नाकारत असेल, पण घरांना लावलेली कुलूपे त्याची साक्ष देत आहेत.खोऱ्यात ५,९०० कर्मचारी आहेत. त्यापैकी १,१०० निर्वासितांच्या शिबिरात व तर ४७०० खासगी निवासस्थानात राहतात. निर्बंध असूनही यातील ८० टक्के कर्मचारी काश्मीर सोडून जम्मूमध्ये पोहोचले आहेत. या स्थितीतही अनंतनाग, बारामुल्ला, श्रीनगरमधील शिबिरांमध्ये राहणारी अनेक कुटुंबे बाहेर पडू शकत नाहीत. कारण प्रशासनाने त्यांना बाहेर पडण्यास बंदी घातली आहे.

कर्मचारी तणावात, कारण सांगून बाहेर
राज्यपाल मनोज सिन्हा यांना भेटलेल्या प्रतिनिधींतील एका काश्मिरी पंडिताने सांगितले की, आम्ही सारे तणावात आहोत. काय घडत आहे? हत्या कोण करत आहे, हे कोणालाच माहीत नाही. अन्य एका कर्मचाऱ्याने सांगितले की, १२ वर्षांपूर्वी आम्ही आलो तेव्हा स्वत:ला सरकारचे अँम्बेसेडर मानायचो. मात्र आम्हाला कर्मचाऱ्यांच्या रुपात स्विकारले गेले नाही. त्यामुळे आम्ही परतण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीनगरमध्ये जवळपास ५०० कर्मचारी आहेत. कोणाकडेही सरकारी घर नाही.

कुठून किती लोकांचे स्थलांतर?
स्थळ एकूण कुटुंबे होती स्थलांतर
श्रीनगर शहर ५०० ३४०
गंदरबल ८० ५०
वेसू, अनंतनाग ३५० १५
बारामुल्ला ३५० ३००
हाल, पुलवामा ६० १०
मट्टन, अनंतनाग ६० ४०
कुपवाडा १५० १२०
खासगी निवास ४७०० कर्मचारी ३५००
अन्य हिंदू ३००० २५००

बातम्या आणखी आहेत...