आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
श्रीनगरमधील हवल चौकात रविवारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर बेच्छुट गोळीबार केला. यात एक जवान आणि एक नागरिक जखमी झाला आहे. सध्यो दोघांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून, सैन्याने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
26 नोव्हेंबरला 2 जवान शहीद झाले होते
यापूर्वी 26 नोव्हेंबरला श्रीनगरच्या HMT परिसरात दहशतवाद्यांनी पेट्रोलिंग पार्टीवर हल्ला केला होता. यात दोन जवान शहीद झाले होते.
मागच्या महिन्यात सात दहशतवादी ठार
मागच्या महिन्यात नगरोटामध्ये सैन्य आणि सुरक्षा दलाने जैशच्या 4 दहशतवाद्यांना मारले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी म्हटले होते की, दहशतवाद्यांनी निवडणुकीपूर्वी मोठा हल्ला करण्यायी योजना आखली होती. पाकिस्तानातील मसूद अजहरचा भाऊ रऊफ लाला यांचा हँडलर होता. यापूर्वी 8 नोव्हेंबरला कुपवाडामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. यात तीन दहशतवादी मारले होते. तसेच, एका कॅप्टनसह तीन जवान शहीद झाले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.