आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुलवामात दहशतवादी हल्ला:अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या टीमला 4 दिवसांत दुसऱ्यांदा केले लक्ष्य, आयईडीच्या स्फोटात एक जवान जखमी

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीआरपीएफच्या गस्त घालणाऱ्या टीमवर हा हल्ला केला. दहशतवाद्यांना मोठे नुकसान करायचे होते, परंतु त्यांना यश आले नाही. - Divya Marathi
सीआरपीएफच्या गस्त घालणाऱ्या टीमवर हा हल्ला केला. दहशतवाद्यांना मोठे नुकसान करायचे होते, परंतु त्यांना यश आले नाही.
  • जम्मू-काश्मीरमधील पुलवामाच्या गंगू भागात हा हल्ला केला, दहशतवाद्यांचा शोध सुरू
  • 1 जुलै रोजी सोपोरमध्ये सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला झाला होता, यात एक सैनिक शहीद झाला होता

जम्मू-काश्मीरात पुलवामाच्या सर्कुलर रोडवर दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्त घालणाऱ्या दलाला निशाणा साधत आयईडीचा स्फोट केला. यानंतर गोळीबार केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. दहशतवाद्यांना मोठे नुकसान करायचे होते, परंतु त्यांना यश आले नसल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षा दलाने परिसर घेरला असून दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. 

4 दिवसांपूर्वी सोपोरमध्ये झाला होता हल्ला 

जम्मू-काश्मीरच्या बारामूला जिल्ह्यातील सोपोर भागात सीआरपीएफच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 1 जवान शहीद तर 3 जखमी झाले होते. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिकाचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीसोबत त्यांचा वर्षाचा नातूही होता. सुरक्षा दलाने मुलाला तेथून सुखरुप बाहेर काढले होते. 

मे महिन्यात अशाच हल्ल्याचा कट उधळून लावला होता 

सुरक्षा दलांनी 28 मे रोजी अशाच एका हल्ल्याचा कट उधळून लावला होता. त्यांना बांदीपोरा जिल्ह्यात राजपुरा रोडवर शादीपुराजवळ एक पांढरी सेंट्रो कार मिळाली होती, ज्यामध्ये आयईडी सापडले होते. कारमध्ये ड्रममध्ये स्फोटके ठेवली होती. माहिती मिळताच सुरक्षादलांनी आसपासचा परिसर रिकामा केला. त्यानंतर बॉम्ब विल्हेवाट लावण्याच्या पथकाने गाडी उडवून दिली. तज्ज्ञांचा अंदाज आहे की कारमध्ये सुमारे 40-50 किलो स्फोटके होती.

पुलवामा हल्ल्यात 350 किलो आयईडीचा वापर केला होता 

14 फेब्रवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामाच्या अवंतीपुरा भागात सीआरपीएफच्या तुकडीवर भ्याड हल्ला झाला होता. गोरीपुरा गावाजवळ झालेल्या या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले होते. 

एका व्यक्तीने स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफच्या जवानांना घेऊन निघालेल्या बसला धडकवली होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पुलवामा हल्ला हा काश्मीरमधील 30 वर्षांचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. दहशतवाद्यांनी या हल्ल्यासाठी 350 किलो आयईडीचा वापर केला होता. 

बातम्या आणखी आहेत...